Buy Cheap Property: जर तुम्ही स्वस्त घर किंवा कोणत्याही प्रकारची मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. प्रत्येकाचे स्वत:चे घर असावे असे स्वप्न असते. मात्र, भरमसाठ किंमतीमुळे अनेकांना घराचे स्वप्न पूर्ण करता येत नाही. परंतु सरकारी बँकांच्यावतीने (Government Bank)जनतेला स्वस्तात जमीन खरेदी करण्याची संधी दिली जात आहे. यामध्ये सर्व प्रकारच्या निवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक मालमत्तांचा समावेश आहे. याबबत अधिक तपशील जाणून घ्या कधीपासून ही संधी मिळणार आहे ते.
देशातील सरकारी बँका तुम्हाला घर आणि मालमत्ता खरेदीची खास संधी देत आहेत. बँक ऑफ बडोदा (Bank Of Baroda) आणि इंडियन बँक (Indian Bank) तुमच्यासाठी ही खास संधी घेऊन आली आहे. सरकारी बँकांकडून जनतेला स्वस्तात जमीन खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये सर्व प्रकारच्या निवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक मालमत्तांचा समावेश आहे.
IBAPIने (Indian Banks Auctions Morgaged Properties Information) 15 आणि 16 नोव्हेंबर रोजीयाबाबत माहिती दिली आहे . इंडियन बँकेने ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे. इंडियन बँकेने आपल्या अधिकृत ट्विटमध्ये लिहिले आहे की, तुमची स्वप्नातील मालमत्ता थोड्याच अंतरावर आहे. तुम्ही इंडियन बँकेच्या मेगा लिलावात सहभागी होऊ शकता. हा ई-लिलाव 15 आणि 16 नोव्हेंबर 2022 रोजी केला जाईल.
अधिकृत लिंक मालमत्तेच्या लिलावाबद्दल अधिक माहितीसाठी, तुम्ही https://ibapi.in/Sale_Info_Home_ib.aspx या लिंकला भेट देऊ शकता . याशिवाय 30 नोव्हेंबर रोजी बँक ऑफ बडोदातर्फे मेगा ई-लिलाव आयोजित करण्यात येणार आहे.
Your Dream Property is a few bids away!
Participate in the Indian Bank Mega Properties
E-Auction on 15th & 16th November, 2022 for options.https://t.co/ofsymNqYDK#IndianBank #AmritMahotsav#dfsindiacelebratesamritmahotsav pic.twitter.com/5hc1pRTVLv— Indian Bank (@MyIndianBank) November 9, 2022
देशातील सर्व बँका वेळोवेळी मालमत्तांचा लिलाव करत असतात. एनपीएच्या यादीत आलेल्या त्या मालमत्ता बँकेकडून ई-लिलावात विकल्या जातात. म्हणजेच ज्या मालमत्तांवर मालकांनी कर्ज घेतल्यानंतर बँकेची थकबाकी परत केली नाही. बँक अशा लोकांच्या जमिनी ताब्यात घेऊन त्याचा लिलाव करते.