पंतप्रधानांचं संबोधन ऐका, चिराग पासवानांचं एलजेपीच्या उमेदवारांना आवाहन

पंतप्रधान मोदी काय बोलणार याकडे सर्व देशाचं लक्षस

Updated: Oct 20, 2020, 03:37 PM IST
पंतप्रधानांचं संबोधन ऐका, चिराग पासवानांचं एलजेपीच्या उमेदवारांना आवाहन title=

पटना : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी 6 वाजता देशाला संबोधित करणार आहेत. पीएम मोदी यांनी ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली आणि लोकांना सहभागी होण्याचे आवाहन केले. पंतप्रधान मोदींच्या घोषणेनंतर लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी देखील मोदींचं संबोधन ऐकरण्याबाबत आवाहन केलं आहे. त्यांनी सर्व एलजेपीच्या उमेदवारांना देखील याबाबत आवाहन केलं आहे.

चिराग पासवान नेहमीच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकास मॉडेलवर त्यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत, तर जेडीयू अध्यक्ष आणि मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या विरोधात जाहीरपणे चिराग यांनी मोर्चा उघडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संबोधनावर चिराग पासवान म्हणाले की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सर्व नागरिकांना संदेश देणार आहेत.'

चिराग पासवान यांनी देशहितासाठी होत असलेलं हे संबोधन ऐकण्याचे आवाहन केले. बिहारमधील एलजेपीच्या सर्व उमेदवारांना परिसरातील लोकांशी संवाद साधण्याचे आवाहन केलं आहे. कोरोनामुळे अंतर ठेवण्याबाबत देखील लक्षं द्या. विशेष म्हणजे कोरोना व्हायरसच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर पीएम मोदी यांनी यापूर्वी यापूर्वी बर्‍याच वेळा देशाला संबोधित केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दुपारी ट्विट केले की, 'मी आज संध्याकाळी 6 वाजता देशाला संबोधित करणार आहे. तुम्ही सामील व्हा'. देशात कोरोना विषाणूचे संकट कायम आहे, पंतप्रधानांनी लोकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. औषधाशिवाय शिथिलता नाही, असा मंत्र पंतप्रधान मोदींनी दिला आहे.