व्यासपीठावर मुख्यमंत्र्यांना डुलकी; नाकावरून घसरला चष्मा

 एका बाजूला राज्याच कारभार, त्यातून मनावर आणि शरीरावरही ओढावलेला ताण तर, दुसऱ्या बाजूला विश्रांती. आता अशा पेचात मार्ग कसा काढावा? 

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Jan 23, 2018, 08:14 PM IST
व्यासपीठावर मुख्यमंत्र्यांना डुलकी; नाकावरून घसरला चष्मा title=

बंगळुरू : मुख्यमंत्री म्हणजे राज्याचे प्रथम नागरीक. त्यांच्यावर कामाचा नेहमीच ताण. त्यात जनसेवेचा वसा घेतल्याने त्यांचे डोळे सताड उघडे. त्यामुळे निर्धास्त झोपेशी त्यांचे नाते कायमच तुटलेले. पण, निसर्ग नियमाने विश्रांती घेणे हे गरजेचे. एका बाजूला राज्याच कारभार, त्यातून मनावर आणि शरीरावरही ओढावलेला ताण तर, दुसऱ्या बाजूला विश्रांती. आता अशा पेचात मार्ग कसा काढावा? यावर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमैय्या यांनी अत्यंत कल्पक असा तोडगा काढला. जो व्हिहिडोच्या माध्यमातून अनेकांपर्यंत पोहोचतो आहे.

वेळेची बचत आणि विश्रांती याचे बेमालूम मिश्रण

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या आपल्या व्यग्रतेतून काहीसा वेळ काढून एका कार्यक्रमाला पोहोचले. आता कार्यक्रम म्हटले की, तडाखेबंद भाषण ठोकून आल्या पावली परत जाता येत नाही. अगोदर आयोजकांनी ठरवून दिलेली भाषणे, हार तुरे, सत्कार आदि गोष्टी होतात. मग कुठे प्रमुख पाहुण्यांना बोलायची संधी. त्यामुळे ही भाषणे सुरू असताना करायचे काय? हा एक अशा मंडळींना सतावणारा प्रश्न. पण, सिद्धरमय्या यात माहिर ठरले. त्यांनी वेळेची बचत आणि विश्रांती याचे बेमालूम मिश्रण केले. त्यांनी थेट व्यासपीठावर बसल्या जागीच ताणून दिली.

झोपेतही रंग भरला

खरी गंमत तर, तेव्हाच आली जेव्हा व्यसपीठावरील नेत्यांच्या रंगलेल्या भाषणाने सिद्धरमय्या यांच्या झोपेतही रंग भरला. एका बाजूला नेत्याच्या भाषणावर उपस्थित अंकड डूंबत होते. तर, दुसरीकडे सिद्धरमय्यांच्या झोपेने फेर धरला होता. इतका की काही वेळा ते डावीकडे तर काही वेळा उजवीकडे डुलत होते. हा प्रकार व्यसपीठावरील अनेकांच्या ध्यानात आला खरा. पण, साक्षात प्रथम नागरिक असलेल्या मुख्यमंत्र्यांना सांगणार कोण. आपण धाडस करावे आणि मध्ये त्यांची झोपमोड व्हावी. मग, त्या रागातून जर भलताच निर्णय घेतला गेला तर, आपल्याला वनवासात जावे लागायचे. या भीतीने कदाचीत कोणी त्यांच्या झोपेत व्यत्यय आणला नसावा. पण...

नाकावरचा चष्मा घसरला

दरम्यान, कार्यक्रमही आटोपत आला होता. सिद्धरमय्यांची झोपही कदाचीत पूर्ण होत आली असावी. कारण, त्यांनी बसल्या जागीच एक जबरदस्त गिरकी घेतली आणि त्यांच्या नाकावरचा चष्मा घसरला. नाकावरून घसरलेल्या चष्माची जाणवी होताच. सिद्धरमय्या खडकन जागे झाले आणि सावरून बसले. जणू काही घडलेच नाही. पण, घडलेले उपस्थितांनी केव्हाच पाहिले होते. मग, सिद्धरमय्या नव्या उत्साहाने भाषणास तयार झाले.

ता. क. संबंधीत घटना ही कन्नड साहित्य परिषदेच्या कार्यक्रमात घडला. या कार्यक्रमात सिद्धरमय्या यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले होते. त्यांच्यासोबत व्यसपीठारव कन्नड साहित्य परिषदेचे अध्यश्र मनू बालगीर, कर्नाटकचे सांस्कृतीक मंत्री उमाश्री यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थीत होते. दरम्यान, व्यसपीठावर जाहीर डुलकी काढल्याने सिद्धरमय्या यापूर्वीही चर्चेत आले होते.