Video: मुलाने 4 लाखांचे बूट आणल्याचं पाहून वडील बॉक्सकडे पाहत राहिले अन् म्हणाले...

Rs 4 lakh Shoes Viral Video: या व्हिडीओला लाखोंच्या संख्येनं व्ह्यूज मिळाले असून त्यावर 1400 हून अधिक कमेंट्स आहेत. हा व्हिडीओ एका व्लॉगरने पोस्ट केला आहे. व्हिडीओ व्लॉगरच्या घरामध्येच शूट करण्यात आला असून तो व्हायरल झालाय.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jul 28, 2023, 10:16 AM IST
Video: मुलाने 4 लाखांचे बूट आणल्याचं पाहून वडील बॉक्सकडे पाहत राहिले अन् म्हणाले... title=
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे

Rs 4 lakh Shoes Viral Video: तुम्ही अनेकदा तुमच्या पालकांबरोबर शॉपिंगसाठी गेला असाल. मात्र गोष्ट आवडल्यानंतर तिची किंमत पाहून नको कशाला एवढा खर्च म्हणत पालकांनी खरेदी टाळल्याचा प्रकार तुमच्याबरोबरही घडला असेल. हा असा प्रकार बऱ्याचदा होतो. बरं हे केवळ तुम्हाला घ्यायच्या असलेल्या वस्तूंबद्दल नाही तर त्यांना स्वत:ला किंवा घरासाठी घ्यायच्या वस्तूंबद्दलही पालकांचा खरेदीचा निर्णय हा किंमतीवर अवलंबून असतो, असं अनेकदा दिसून येतं. नुकताच असा प्रकार व्लॉगर यदुप्रियम मेहताबरोबर घडला. त्याने पोस्ट केलेला एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कोणी पोस्ट केलाय हा व्हिडीओ?

यदुप्रियम मेहताने बुटांचा एक नवा जोड घरी आणला. सुरुवातीला यदुप्रियमच्या वडिलांनी हे बूट पाहून त्यांचं फार कौतुक केलं. हे बूट किती छान आहेत, मस्त दिसतायत वगैरे वगैरे प्रतिक्रिया दिल्यानंतर बुटांची किंमत ऐकून त्यांना धक्काच बसला. लेकाने विकत घेतलेल्या आणि सध्या आपल्या हातात असलेल्या बुटांची किंमत 4 लाख रुपये असल्याचं समजल्यानंतर त्यांनी दिलेली प्रतिसाद हा फारच व्हायरल झाला आहे.

व्हिडीओत काय आहे?

यदुप्रियम मेहताने इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्याने, "4 लाखांच्या बुटांवर वडिलांनी दिलेली प्रतिक्रिया, आज थोडक्यात वाचलोय मी" अशी कॅप्शन दिली आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला यदुप्रियमचे वडील बेडवर बसल्याचं दिसत आहे. यदुप्रियम त्यांच्या हातात एक बॉक्स देतो. हे बॉक्स उघडल्यानंतर त्यामधील बूट पाहून वडिलांना फार आनंद होतो. 

बुटांची किंमत 4 लाख असल्याचं समजल्यानंतर...

यदुप्रियमने वडिलांच्या हातात दिलेल्या बॉक्समध्ये नायकी कंपनीचे चंकी डंकी स्नीकर्स असतात. हे बूट पसंत पडल्यानंतर वडिलांनी उत्साहाने या बुटांची किंमत किती असं विचारलं. त्यावेळेस यदुप्रियमने हे बूट 4 लाखांचे आहेत असं सांगितलं तेव्हा वडिल काही क्षण आश्चर्याने या बुटांकडे पाहत राहिले. त्यानंतर त्यांनी आपल्या मुलाकडे पाहत, "पागल हो क्या?" असा प्रश्न विचारला. हा व्हिडीओ 11 जुलै रोजी पोस्ट करण्यात आला असला तरी तो अजूनही व्हायरल होत असून लोक त्याच्यावर आजही कमेंट्स करताना दिसत आहेत. तुम्हीही पाहा हा व्हायरल व्हिडीओ...

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Yadupriyam Mehta (@ypmvlogs)

हजारो कमेंट्स

यदुप्रियमचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला लाखोंच्या संख्येनं व्ह्यूज आहेत. या व्हिडीओवर 1 हजार 400 हून अधिक कमेंट्स आल्या आहेत.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x