मुंबई : राजधानी दिल्लीत भीषण अग्नी तांडव पाहायला मिळत आहे. लाजपत नगरमधील कपड्यांच्या शोरूमला भीषण आग लागली आहे. अग्निशमनदलाच्या 30 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. (Delhi Fire Department rushes a total of 30 fire engines for firefighting at a clothing showroom in Lajpat Nagar). दिल्लीतली ही सर्वात मोठी आग आहे.
#UPDATE | Delhi Fire Department rushes a total of 30 fire engines for firefighting at a clothing showroom in Lajpat Nagar pic.twitter.com/jaJPRGmwvG
— ANI (@ANI) June 12, 2021
सेंट्रल मार्केटच्या केएफसीजवळील कपड्यांच्या शोरूमला आग लागली आहे. सकाळी 10.30 च्या सुमारास ही आग लागली आहे. कपड्यांमुळे आगीने रौद्र रूप धारण केलं.
Delhi: Fire breaks out at a clothing showroom in Central Market of Lajpat Nagar area; 16 fire tender on the spot pic.twitter.com/bpAZTSVs9J
— ANI (@ANI) June 12, 2021
अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आगीच कारण अद्याप समजू शकलेले नाही. लाखो रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. अद्याप कोणतीही जीवितहानी नाही.
Delhi: Firefighting operation underway at a clothing showroom in Lajpat Nagar pic.twitter.com/FwNznpRIv4
— ANI (@ANI) June 12, 2021
पाच मोठी कपड्यांची दुकानं आगीच्या विळख्यात. बाटला हँडलूम, संगम साडी आणि रेमंड अशी तीन आणखी दोन मोठ्या दुकानांचा समावेश यामध्ये आहे. दिल्लीत वाऱ्याचे प्रमाण अधिक असल्याने विझवलेली आग पुन्हा पेटली.