मुंबई : आताचा काळ असा आहे की, अगदी लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वच लोक मोबाईल फोन वापरतात. लोकांना जणू काही त्याचं वेडचं लागलंय. काही लोक फॅशन म्हणून किंवा चर्चेत राहाण्यासाठी वेगवेगळे फोन वापरतात. तर काही लोकं 3 ते 4 वर्षांनी जुन्या फोनमध्ये समस्या येऊ लागल्यामुळे दुसरा फोन घेण्याच्या पर्यायाकडे वळतात. नवीन फोन विकत घेताना लोक अपडेटे वर्जन आणि चांगल्या फीचर्सच्या पर्यायाकडे वळतात. साहजिकच असा स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी तुम्हाला मोठी रक्कम मोजावी लागते. परंतु बाजारात असे अनेक शॉर्टकट आहेत, ज्याद्वारे लोकं कमी किंमतीत प्रीमियम स्मार्टफोन खरेदी करतात. पण हे शॉर्टकट तुम्हाला तुरुंगात देखील टाकू शकतात हे विसरु नका. त्यामुळे फोन घेताना विचार करा आणि स्वस्त्यात फोन मिळतोय म्हणून तो कुठूनही घेऊ नका.
कमी पैशात प्रीमियम स्मार्टफोन खरेदी करण्याचा एक मार्ग म्हणजे अंडरग्राउंड मार्केट. परंतु हे लक्षात घ्या की, अंडरग्राउंड मार्केट पूर्णपणे बेकायदेशीर आहेत आणि बहुतेक अशी गॅजेट्स इथे येतात जी चोरीला जातात किंवा बनावट असतात.
येथून स्मार्टफोन खरेदी केल्याने तुम्हाला धोका निर्माण होऊ शकतो आणि तुम्हाला तुरुंगातही जावे लागू शकते.
तर आता तुम्ही इथून स्मार्टफोन विकत घेतल्यामुळे तुम्ही तुरुंगात कसे पोहोचाल? असा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल, तर आम्ही तुम्हाला सांगतो की, अनेकवेळा असे स्मार्टफोन येथे खरेदी-विक्री केले जातात ज्याचा वापर काही अवैध कामांसाठी केला
गेला आहे.
अशा परिस्थितीत तुम्ही येथून विकत घेतलेला स्मार्टफोन जर एखाद्याला धमकावण्यासाठी किंवा चूकीच्या कामासाठी वापरला गेला असेल किंवा तो चोरीला गेलेला फोन असेल तर, तो सापडेल आणि त्यामुळे तुम्ही या स्मार्टफोनचा मालक म्हणून अडचणीत याल.
अंडरग्राउंड मार्केटमध्ये विकल्या जाणार्या स्मार्टफोनची किंमत 10 हजार ते 20 हजार रुपये असेल, परंतु प्रत्यक्षात हे स्मार्टफोन खूप महाग असतात. कमी किंमतीमुळे लोक इथून स्मार्टफोन खरेदी करतात, परंतु असे करून ते आपल्यावर मोठं संकट ओढावून घेत आहेत, याचा ते विचार देखील करत नाहीत.