कोरोना झाल्याच्या भीतीपोटी प्यायला रॉकेल आणि...

लोकांमध्ये कोरोनाची भीती कशी पसरली याचे एक गंभीर उदाहरण भोपाळमध्ये समोर आलं आहे.

Updated: May 19, 2021, 12:40 AM IST
कोरोना झाल्याच्या भीतीपोटी प्यायला रॉकेल आणि... title=

भोपाळ : लोकांमध्ये कोरोनाची भीती कशी पसरली याचे एक गंभीर उदाहरण भोपाळमध्ये समोर आलं आहे. एका व्यक्तीने कोरोनाचा संसर्ग झाल्याने भीतीपोटी रॉकेल पिल्याने त्याचा मृत्यू झाला. पण जेव्हा त्याची कोरोना चाचणी झाली तेव्हा तो निगेटिव्ह आला.

30 वर्षीय महेंद्र काही दिवसांपासून तापाने ग्रस्त होता, त्याला कोरोनाची लागण झाली अशी भीती होती. मग मित्राच्या सल्ल्यानुसार त्याने कोरोनामधून बरे होण्यासाठी रॉकेल पिलं, त्यानंतर त्याची प्रकृती अधिकच बिकट झाली. त्या माणसाला त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले पण शेवटी त्याचा मृत्यू झाला.

भोपाळमध्ये टेलर काम करणाऱ्या महेंद्र यांना गेल्या 6 दिवसांपासून ताप होता आणि औषध घेतल्यानंतरही ताप जात नव्हता. अशा परिस्थितीत महेंद्रने स्वतःला कोरोनाचा संसर्ग झाल्याचा संशय आल्याने त्याने एका मित्राच्या सल्ल्याने रॉकेल घेतलं. एका संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्याचा त्यांना संशय होता.

रॉकेल पिल्यानंतर महेंद्रची प्रकृती खालावली आणि घरातील लोकांनी त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. परंतु तेथे बेड रिक्त नसल्याचे सांगून त्याला प्रवेश नाकारण्यात आला. त्यानंतर खासगी रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले. पण अखेर शनिवारी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालय प्रशासनाने नंतर तिची कोरोना टेस्ट केली ज्यामध्ये महेंद्रची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली.