Edible Oil Price : खाद्यतेलासंदर्भातील खिशावर परिणाम करणारी बातमी; आताच वाचा

Edible Oil : सणावारांची रांग लागलेली असतानाच मोठा बदल 

Updated: Sep 15, 2022, 07:53 AM IST
Edible Oil Price : खाद्यतेलासंदर्भातील खिशावर परिणाम करणारी बातमी; आताच वाचा  title=
Edible Oil prices might decreases read reasons

Edible Oil : गणेशोत्सवामागोमागच (Ganeshotsav 2022) आता नवरात्रोत्सव (Navratri 2022)आणि त्यानंतर दिवाळी (Diwali 2022) अशी सणावारांची रांग लागलेलीच आहे. सणवार आले, की ओघाओघाने खर्चांचा डोंगर उंचावतच जातो. येणाऱ्या दिवसांमध्ये सणांची रेलचेल पाहता, त्यादरम्यान मेजवान्यांचा बेत आखला जाणार, फराळांची तयारी होणार हे नक्की. पण, त्यातच तेलाच्या दरांमध्येही मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तेल दरांमध्ये बदल होणार म्हणजे नेमके ते वाढणार की कमी होणार? हाच प्रश्न तुम्हालाही पडला ना? (Edible Oil prices might decreases read reasons )

येत्या दिवसांमध्ये तुमच्या या प्रश्नाचं उत्तरही मिळेल आणि चिंताही मिटेल कारण, खाद्यतेलांच्या (Edible oil prices) किमतींमध्ये घसरण होण्याची शक्यता आहे. भारतात ऑगस्ट महिन्यामध्ये पामतेलाच्या (Palm oil) आयातीत 87 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. तर, सध्या सुरु असणाऱ्या महिन्यात 10 लाख टन तेलाची आयात होण्याची चिन्हं आहेत. ही एकंदर आकडेवारी पाहता तेलाचे दर कमी होण्याची चिन्हं आहेत. 

वाचा : WPI Inflation: थोडी खूशी, थोडा गम; पाहा ऑगस्टमध्ये किती राहिला महागाई दर

 

आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलांचे दर जवळपास 40 % नी खाली आले आहेत. ज्यामुळं आता सर्वसामान्यांच्या खर्चातून काही अंशी बचत नक्कीच होणार आहे. येत्या काळात पामतेलाची मागणी वाढू शकते ही बाब लक्षात घेता सध्या त्याचीच आयात वाढवण्यात आली आहे. 

पुरवठा आणि साठवण वाढल्यामुळं परिणामी आता या तेलाच्या किमती खिशाला फटका देणार नाहीत यासाठी पूरक वातावरण पाहायला मिळत आहे.