नवी दिल्ली : जयपूर विमानतळावर बुधवारी सकाळी स्पाईसजेटच्या एसजी-५८ या विमानाची एमर्जन्सी लॅन्डींग करण्यात आलं. टायर फुटल्यानं या विमानाचं तातडीनं लॅन्डिंग करण्यात आलं. या विमानात १८९ प्रवासी होते. अपघातानंतर प्रवासी धास्तावले होते परंतु, सुखद बाब म्हणजे विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. एमर्जन्सी लॅन्डिंगनंतर या प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. एअरक्राफ्टचं टायर फुटल्यानं सकाळी ९.०३ मिनिटांनी जयपूर विमानतळावर या विमानाचं इमर्जन्सी लॅन्डींग करण्यात आलं.
Rajasthan: Emergency landing of SpiceJet Dubai-Jaipur SG 58 flight with 189 passengers took place at Jaipur airport at 9:03 am today after one of the tires of the aircraft burst. Passengers safely evacuated. pic.twitter.com/H7WE9Yxroy
— ANI (@ANI) June 12, 2019
मिळालेल्या माहितीनुसार, जयपूर विमानतळावर बुधवारी सलग चौथ्या दिवशी चार उड्डाणं रद्द झाली. गेल्या चार दिवसांत एकूण १६ विमानं रद्द झालीत. सूत्रांच्या माहितीनुसार, एअरलाईन्सकडे गेल्या काही दिवसांपासून क्रू मेम्बर्सची संख्य कमी आहे. त्याचा परिणाम गेल्या काही दिवसांपासून विमानांच्या उड्डाणावरही होतोय. यामुळे जवळपास ८०० प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागलाय.