close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

दिवाळीची शॉपिंग करण्याआधी हे वाचा, अन्यथा रिकामी होईल अकाऊंट

 तुमचा थोडासाही निष्काळजीपणा तुमचे अकाऊंट रिकामी करुन तुमची दिवाळी खराब करु शकतो. 

Updated: Oct 21, 2019, 08:56 AM IST
दिवाळीची शॉपिंग करण्याआधी हे वाचा, अन्यथा रिकामी होईल अकाऊंट

नवी दिल्ली : देशात सणासुदीचे दिवस सुरु असून सर्वजण जोरदार खरेदीला लागले आहेत. काहीजण ऑनलाईन तर काहीजण ऑफलाईन शॉपिंग करत आहेत. ऑफलाईन शॉपिंग सोबत ऑनलाईन शॉपिंगची संख्या दिवसेंदिवस वाढली आहे.  ऑनलाईन शॉपिंग करताना डिजीटल पेमेंट केल्यानंतर फसवणूक होऊन अकाऊंट रिकामी झाल्याचे प्रकार समोर येत आहे. त्यामुळे सणासुदीमध्ये खरेदी तर जोरदार करा पण जरा संभाळून करा. कारण तुमचा थोडासाही निष्काळजीपणा तुमचे अकाऊंट रिकामी करुन तुमची दिवाळी खराब करु शकतो. 

ऑनलाईन शॉपिंग करताना कोणालाही आपला वन टाईम पासवर्ड, पिन नंबर, डेबिट अथवा क्रेडीट कार्डचा CVV नंबर सांगू नका. अनेक घोटाळे हे नंबर उघड झाल्यानंतरच झाले असल्याचे पाहायला मिळत आहे. 

फोन कॉलवर बॅंकेच्या नावे फोन येतात आणि तुमचे कार्ड ब्लॉक होणार असल्याचे सांगितले जाते. त्यानंतर पासवर्ड बदलण्याच्या नावाखाली तुमच्याकडे CVV नंबर मागितला जातो. 

तसेच बॅंक अकाऊंट किंवा ऑनलाईन बॅंकींगची माहीती फोनमध्ये सेव्ह करु नये. बॅंक अकाऊंट नंबर, पासवर्ड, एटीएम कार्ड नंबर किंवा कशाचा फोटो मोबाईलमध्ये ठेवणे तुमच्यासाठी तोट्याचे ठरू शकते.