पूरग्रस्त कर्नाटक-बिहारला मदत पॅकेज जाहीर

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची माहिती

Updated: Oct 5, 2019, 01:53 PM IST
पूरग्रस्त कर्नाटक-बिहारला मदत पॅकेज जाहीर title=
फोटो सौजन्य : एएनआय

नवी दिल्ली : केंद्र सरकारने (Central Government) पूरग्रस्त कर्नाटक (Karnataka) आणि बिहारसाठी (Bihar) मदत जाहीर केली आहे. नॅशनल डिझास्टर रेस्पॉन्स फंडमधून बिहारला ४०० कोटी आणि कर्नाटकला १२०० कोटी रुपयांची अतिरिक्त मदत जाहीर करण्यात आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी याबाबत माहिती दिली.

याशिवाय केंद्र सरकारने बिहारच्या एसडीआरएफसाठी २०१९-२० सालची आगाऊ रक्कम जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत बिहारला २१३.७५ कोटी रुपयांची मदत होणार आहे.

२७ ते ३० सप्टेंबरदरम्यान झालेल्या मुसळधार पावसाने राजधानी पटनासह बिहारच्या १५ जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली. या पुरात जनजीवन विस्कळीत झाले असून २० लाखहून अधिकांना पुराचा फटका बसला आहे. कर्नाटकातही नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.