मुंबई : फ्रान्सकडून घेतलेली पाचही राफेल विमानांनी भारतीय हद्दीत प्रवेश केला आहे. काही मिनिटांतच पाच राफेल विमानं अंबाला एअरबेसवर उतरतील. राफेल विमानांचे भारतीय सीमेत प्रवेश करताच आयएनएस कोलकाताने स्वागत केले. यानंतर दोन सुखोई विमानांनी पाच राफेल विमानांना एस्कॉर्ट केलं.
पाच राफेल विमानं काही मिनिटांत अंबाला एअरबेसवर पोहोचणार आहेत. 17 गोल्डन अॅरो स्क्वॉड्रॉनचे कमांडिंग ऑफिसर ग्रुप कॅप्टन हरकीरत सिंग यांच्या नेतृत्वात ही विमान फ्रान्समधून भारतात आली आहेत.
संरक्षण मंत्रालयाने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये राफेल विमाने भारतीय हवाई हद्दीत प्रवेश करताच राफेल विमानांना अंबाला एअरबेसपर्यंत २ सुखोई लढाऊ विमानं एस्कॉर्ट करणार आहेत.
The five Rafales escorted by 02 SU30 MKIs as they enter the Indian air space.@IAF_MCC pic.twitter.com/djpt16OqVd
— रक्षा मंत्री कार्यालय/ RMO India (@DefenceMinIndia) July 29, 2020
फ्रान्समधून उड्डाणानंतर पाच राफेल विमानांना संयुक्त अरब अमिरातीच्या (युएई) अल डाफरा विमानतळावर विश्रांतीसाठी उतरवण्यात आले. आज सकाळी विमानं युएईमधून निघताच काही वेळेतच भारतीय हद्दीत आली. या विमानांनी अरबी समुद्रावरून भारतात प्रवेश केला. तेव्हा आयएनएस कोलकाता कंट्रोल रूममधून त्यांचे स्वागत करण्यात आले.