तुम्ही FD मध्ये गुंतवणूक करता; मग 'या' गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं

त्यामुळे आता FD मध्ये गुंतवणूक करण्याची योग्य वेळ कुठली असा प्रश्न गुंतवणूकदारांसमोर पडला आहे. 

Updated: Aug 6, 2022, 12:51 PM IST
 तुम्ही FD मध्ये गुंतवणूक करता; मग 'या' गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं title=
fixed deposit interest how to choose the best fixed deposit plan in marathi

Fixed Deposit Interest : भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) गेल्या महिन्यात दोन वेळा रेपो रेटमध्ये 0.90 टक्के वाढ केली आहे. त्यानंतर बँकांनी त्यांच्या फिक्स्ड डिपाझिटवर (Fixed Deposit) व्याजदरामध्ये वाढ केली आहे. त्यामुळे आता FD मध्ये गुंतवणूक करण्याची योग्य वेळ कुठली असा प्रश्न गुंतवणूकदारांसमोर पडला आहे. (fixed deposit interest how to choose the best fixed deposit plan in marathi)

यामध्ये करा गुंतवणूक 

तुम्ही पहिल्यांदाच गुंतवणूक करणार असेल तर स्मॉल सेव्हिंग स्कीमने सुरुवात करावी. त्याशिवाय तुम्ही एफडी, टार्गेट मॅच्युरिटी फंड, फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅन्स, डेट फंड्समध्ये गुंतवणूक करु शकतात. 

या गुंतवणुकीवर असा मिळतो व्याज

FD                       5.5%
डेट फंड                5.25%-5.45%
PPF                      7.1%
SSY                      7.6%
KVP                      6.9%
SCSS                    7.4%

स्मॉल सेव्हिंग योजनचे फायदे

1. बँक ठेवीपेक्षा चांगला व्याजदर
2. कलम 80C अंतर्गत लाभ
3. 1.5 लाखांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कर सूट
4. दीर्घ लॉक-इन कालावधी, कमी लिक्विडिटी
5. 10 वर्षांपर्यंतच्या मुलींसाठी SSY
6. SSY- सुकन्या समृद्धी योजना
7. SCSS - 60 वर्षांवरील नागरिकांसाठी
8. SCSS-ज्येष्ठ नागरिक बचत योजना
9. PPF, SSY मध्ये EEE लाभ

त्याशिवाय याही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.

1. बँकेची विश्वासार्हता तपासा
2. वेगवेगळ्या बँकांची व्याजदराची माहिती घ्या
3. मुदतीपूर्वी पैसे काढण्याबद्दल बँकांची नियमावली नीट तपासा
4. काही बँका फिक्स्ड डिपॉडिटद्वारे काही गुंतवणूकदारांना कर्जाची सुविधा दिली जाते. याची माहिती काढा.