आता गोव्यात मोफत वीज, पाणी देण्याची अरविंद केजरीवाल यांची मोठी घोषणा

 Goa Election : आम आदमी पार्टीचे (AAP) नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा केली आहे.  

Updated: Feb 3, 2022, 11:42 AM IST
आता गोव्यात मोफत वीज, पाणी देण्याची अरविंद केजरीवाल यांची मोठी घोषणा title=

पणजी : Goa Election : आम आदमी पार्टीचे (AAP) नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा केली आहे. गोव्यात (Goa) जनतेने आम्हाला निवडून दिले तर मोफत वीज (Free Electricity) आणि पाणी देऊ, अशी घोषणा केजरीवाल यांनी केली आहे. (Free electricity and water to the people of Goa, Arvind Kejriwal promised the people) 

गोवा विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरु आहे. 'आप'ने आपला जाहीरनामा जाहीर करताना मोफत वीज आणि पाणी देण्याची घोषणा केली आहे. गोव्यातील जनतेने आम्हाला निवडून दिले तर दिल्ली प्रमाणे मोफत वीज आणि पाणी दिले जाईल, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.

गोव्यातील जनतेला आवाहन करताना आम आदमी पक्षाचे (आप) नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गोव्यातील जनतेला मोफत वीज आणि मोफत पाणी देण्याचे आश्वासन देत जनतेला मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

दरवर्षी दोन लाखांचा फायदा : केजरीवाल

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गोव्यातील जनतेला संबोधित करताना सांगितले की, जर त्यांचा पक्ष यावेळी गोव्यात सत्तेवर आला तर पाच वर्षांत प्रत्येकाला किमान दहा लाखांचा फायदा करुन दिला जाईल.