सोनं आणि चांदीचे भाव वाढले

सोनं आणि चांदी महागली

Updated: Aug 26, 2018, 12:21 PM IST
सोनं आणि चांदीचे भाव वाढले title=

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात आणि स्थानिक बाजारात सोन्याची मागणी वाढल्यामुळे सोनं पुन्हा एकदा चमकलं आहे. मागील आठवड्यात सोन्याचा भाव वाढला आहे. दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचा भाव 650 रुपयांनी वाढला. 30,900 रुपये प्रति 10 ग्रॅमवर सोनं पोहोचलं आहे. दुसरीकडे चांदीची मागणी वाढल्याने चांदीचा भाव देखील वाढला आहे.

सोन्याची मागणी वाढली

डॉलरचा दबाव वाढल्याने सुरक्षेची गुंतवणूक म्हणून सोन्यात लोकांनी गुंतवणूक केल्याने सोन्याची मागणी वाढली. त्यामुळे चोन्याचे भाव देखील वाढले आहेत. याशिवाय सध्या सणांचे दिवस सुरु असल्याने स्थानिक बाजारात देखील सोन्याची मागणी वाढली आहे. राजधानी दिल्लीत 99.9 टक्के शुद्ध सोनं आणि 99.5 टक्के शुद्ध सोनं अनुक्रमे मागील आठवड्यात 650-650 रुपयांनी वाढून 30,900 रुपये आणि 30,750 रुपये प्रति 10 ग्रॅम झालं आहे.

silver gold

चांदींचा भाव देखील 250 रुपयांनी वाढून 38,250 रुपये प्रति किलो झाला आहे.