स्वस्त झालं सोनं-चांदी, दागिने खरेदी करण्यासाठी योग्य वेळ

दागिने निर्मात्यांकडून होणाऱ्या सोन्या-चांदीच्या मागणीत घट झाल्याने दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या आणि चांदीच्या दरात घसरण झाल्याचं पहायला मिळालं. त्यामुळे सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी ही एक दिलासादायक बातमी आहे.

Updated: Jun 2, 2018, 08:11 AM IST
स्वस्त झालं सोनं-चांदी, दागिने खरेदी करण्यासाठी योग्य वेळ title=
File Photo

नवी दिल्ली : दागिने निर्मात्यांकडून होणाऱ्या सोन्या-चांदीच्या मागणीत घट झाल्याने दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या आणि चांदीच्या दरात घसरण झाल्याचं पहायला मिळालं. त्यामुळे सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी ही एक दिलासादायक बातमी आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर धांतुंच्या किमतीत सुरु असलेला चढ-उतारामुळे आणि मागणीत घट झाल्याने सोन्याच्या दरात १०० रुपयांनी घट झाली तर चांदीच्या दरातही ४५० रुपयांनी घट झाली आहे.

सोन्याच्या दरात घट

ज्वेलर्सकडून होत असलेल्या कमी मागणीमुळे सोन्याच्या दरात १०० रुपयांनी घट झाली आहे. सोन्याच्या दरात १०० रुपयांनी घट झाल्याने सोन्याचा दर ३१,९०० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे.

चांदीचा दरही घसरला

सोन्याच्या किंमतीसोबतच चांदीच्या दरातही घट झाली आहे. चांदीच्या दरात ४५० रुपयांनी घट झाल्याने ४०,६०० रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचली आहे.

व्यापाऱ्यांच्या मते, स्थानिक दागिने निर्माते आणि सराफांकडून होणारी मागणी कमी झाल्याने सोनं-चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर गुरुवारी न्यूयॉर्कमध्ये सोनं ०.२३ टक्क्यांनी घट झाल्याने तो १,२९७.३० डॉलर प्रति औंस झाला आहे. तर, चांदीमध्येही ०.५८ टक्क्यांनी घट झाल्याने १६.३९ डॉलर प्रति औंस झाला आहे.

देशाची राजधानी दिल्लीमध्ये ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याच्या किंमतीत १००-१०० रुपयांनी घट झाली आहे. त्यामुळे हा दर क्रमश: ३१,९०० रुपये आणि ३१,७५० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे. गुरुवारी सोन्याच्या दरात ९० रुपयांनी घट झाली होती.