सोन्याच्या दरांत वाढ; जाणून घ्या काय आहे १० ग्रॅमचा भाव

सोमवारी बाजार सुरु होताच सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याचं पाहायला मिळालं.

Updated: Jun 22, 2020, 02:21 PM IST
सोन्याच्या दरांत वाढ; जाणून घ्या काय आहे १० ग्रॅमचा भाव title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : सोन्याच्या दरांत सोमवारी बाजार सुरु होताच वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. सोमवारी सकाळी जवळपास 10 वाजता मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याच्या दरांत 250 रुपयांची वाढ झाली. तर चांदीच्या दरात 476 रुपयांची घसरण झाली. त्यामुळे MCXवर सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅमसाठी 48,187 रुपये होता. तर चांदीचा दर प्रति किलो 49,112 रुपये इतका होता.

सोन्याचा दर सध्या 47 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचला आहे. आंतरराष्ट्रीय मार्केटनुसार, 2021पर्यंत सोन्याचा भाव 80 हजार प्रति 10 ग्रॅम पोहचण्याची शक्यता, वर्तवण्यात आली आहे. 

बँक ऑफ अमेरिका सिक्युरिटीज विश्लेषकांच्या अंदाजानुसार, 2021च्या शेवटापर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत 3000 डॉलर प्रति औसपर्यंत पोहचू शकते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर औंसनुसार ठरतात. एक औंस म्हणजे 28.34 ग्रॅम वजन असतं. त्यामुळे एक ग्रॅम सोन्याची किंमत 8075 रुपये इतकी असते. त्यानुसार, 10 ग्रॅम सोन्याची किंमत 80 हजार 753 रुपये इतकी होते. 

'या' राज्यात कोरोनाचा पहिला बळी

कोरोनाचा कहर अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम करत आहे. कोरोनामुळे जागतिक आर्थिक बाजारात, शेअर मार्केटमध्येही अनिश्चिततेचं वातावरण आहे. देशात, जगभरात आर्थिक संकटाच्या काळात गुंतवणूकदारांची, गुंतवणूकीसाठी पहिली पसंती सोन्यालाच असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. 

लॉकडाऊन दरम्यानही सोन्या-चांदीच्या भावात सतत चढ-उतार पाहायला मिळत होते. सध्याचं शेअर मार्केटमधील अनिश्चिततेचं वातावरण पाहता गुंतवणूकदारांचा सोनं खरेदीसाठी कल आहे. त्यामुळे सोन्याची मागणी आणि किंमती दोघांमध्येही वाढ पाहायला मिळाल आहे. 

'सॅटेलाईट फोटोमधून चीनने भारतीय हद्दीत घुसखोरी केल्याचं दिसतंय'