Gold Silver Price : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, एवढ्या रुपयांनी स्वस्त झालं सोनं

सोन्याच्या दरात गुंतवणूक करण्याची उत्तम संधी 

Updated: Oct 5, 2021, 12:40 PM IST
Gold Silver Price : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, एवढ्या रुपयांनी स्वस्त झालं सोनं

मुंबई : सोने, चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. एमसीएकसवर सोन्याचा वायदा 0.23% घसरण झाली असून 10 ग्रॅम सोन्याच्या दराची किंमत 46779 रुपये झाली आहे. चांदी 0.5% घसरण झाली असून प्रती किलोग्रॅमची किंमत 60651 रुपये. पिवळ्या रंगाच्या धातूचा गेल्यावर्षी उच्चांक स्तर 10 ग्रॅम करता 56200 रुपये होता. आता या दरात 9421 रुपये घसरण झाली आहे. 

ऑगस्टमध्ये सोन्याची अधिक आयात झाली. तरी देखील भारतात सोन्याची मागणी कमी होती. 

रेकॉर्ड स्तरापेक्षा 9400 रुपयांनी स्वस्त

गेल्यावर्षी सोन्याच्या किंमतीने 56200 रुपयांचा सार्वकालिक उच्चांक गाठला होता. त्या स्तरापेक्षा सोने सध्या 9400 रुपयांनी स्वस्त झाले आहे. मात्र, आगामी काळात सोन्याचा भाव पुन्हा वाढेल, असा अंदाज बहुतांश जाणकारांनी वर्तविला आहे.

सणासुदीपूर्वी सोनं खरेदी करण्याचा सल्ला

कमोडिटी मार्केट तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, डॉलर आणि बॉण्ड्सवरील व्याज वाढल्यामुळे सोन्याच्या किंमतीवर दबाव आहे. आगामी काळातही हा दबाव कायम राहील. मात्र, कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे जगातील महागाईचा दर वाढेल. अशा स्थितीत सोन्याची मागणी पुन्हा वाढेल आणि किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून सोन्याचे भाव वाढण्याचा ट्रेंड पुन्हा सुरू होऊ शकतो. सणासुदीचा हंगाम जवळ आल्याने मागणीही वाढेल आणि किंमती वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोने खरेदीसाठी सध्याचा काळ अत्यंत योग्य असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

येत्या दिवाळीपर्यंत सोनं 49 हजारांवर

सध्या सोनं 45 ते 46 हजार रुपये प्रतितोळा या पातळीवर आहे. ही सोने खरेदीसाठी उत्तम संधी असल्याचे मानले जात आहे. येत्या तीन महिन्यात सोन्याच्या किंमतीत 4-5 हजारांपर्यंत वाढ होऊ शकते. दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव 49 हजारापर्यंत पोहोचू शकतो. पुढील तीन महिन्यांत चांदीचा भाव सध्याच्या पातळीपासून 10 हजारांपर्यंत वर जाऊ शकतो. गेल्या आठवड्यात, मार्च 2022 च्या डिलिव्हरीसाठी चांदीचा बंद भाव 60,967 रुपये प्रति किलो होता.