Gold Silver Rate Today: ही संधी सोडू नका! सोने-चांदी झालं स्वस्त, खरेदीकरण्यापूर्वी जाणून घ्या आजचे दर

Gold Price in Maharashtra Today: सोने खरेदी करणे हा भारतीयांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. दीर्घकालीन गुंतवणूक, मंगल प्रसंग तसेच एखाद्या सणाच्य निमित्ताने अनेकजण सोने खरेदी करतात....   

Updated: Feb 26, 2023, 11:54 AM IST
Gold Silver Rate Today: ही संधी सोडू नका! सोने-चांदी झालं स्वस्त, खरेदीकरण्यापूर्वी जाणून घ्या आजचे दर  title=

Gold Silver Rate in Maharashtra Today: सोने चांदी खरेदीकरण्यासाठी इच्छुक ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी असून आज सोन्याच्या (Gold Price) किंमतींमध्ये घट तर चांदी स्थिर आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव रोज बदलत असतात. त्यामुळे सोने खरेदी करण्यापूर्वी आजचे दर माहिती असणे आवश्यक आहे. दरम्यान गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी 67,500 रुपये प्रति किलोने विकली जात आहे.  तर मागील ट्रेडमध्ये चांदीची (Silver Price) किंमत 68,300 रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात. 

दर दोन दिवसांनी नवे दर जाहीर 

आठवड्याच्या पहिल्या दिवशी व्यावसायिक सप्ताह सुरू होतो. अशा परिस्थितीत आज नव्या व्यावसायिक आठवड्याच्या पहिल्या दिवशी भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीची (gold silver) वाटचाल कशी होते याकडे सर्वांचे लक्ष असेल. यामध्ये इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) ने नवे दर जाहीर केले आहे. 

वाचा:  या शहरांमध्ये स्वस्त झाले पेट्रोल डिझेल, पहा नवे दर  

महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील सोन्याचा भाव.. 

शहर -  22  कॅरेट (रु.)   24 कॅरेट (रु.) (10 ग्रॅम) (Today's Gold Rate in Maharashtra)

मुंबई  - 51,500        56,180 
पुणे    - 51,500        56,180
नागपूर- 51,500        51,500
नाशिक - 51,530      56,210 
 

मिस्ड कॉल देऊन किंमत जाणून घ्या (Check Gold Rate Today on SMS)

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. त्यानंतर लगेचच एसएमएसद्वारे दर प्राप्त होतील. 

अशा प्रकारे सोन्याची शुद्धता जाणून घ्या (Check Gold Purity)

आता सोन्याची शुद्धता तपासायची असेल, तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. बीआयएस केअर अॅपद्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्याच्याशी संबंधित कोणतीही तक्रारही करू शकता.