मुंबई : नवीन इलेक्ट्रिक कार/बाईक घेणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. एप्रिलपासून इलेक्ट्रिक वाहनं स्वस्त होणार आहेत. केंद्र सरकारकडून नवीन आर्थिक वर्षात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्यासाठी धोरण लागू करण्यात येणार आहे.
नवीन आर्थिक वर्षात म्हणजेच एप्रिलपासून बॅटरी स्वॅपिंग पॉलिसी लागू होणार आहे. त्यामुळे गाड्यांच्या किंमती 30 टक्क्यांनी कमी होणार आहेत.
सोबतच चार्जिंग पॉईंट्सवर वेळा घालवण्याचा त्रास होणार नाही.
अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी शहरी भागात मोठ्या प्रमाणावर चर्जिंग स्टेशन उभारण्यासाठी जागेची कमतरता लक्षात घेऊन बॅटरी स्वॅपिंग धोरण आणण्याची घोषणा त्यांनी अर्थसंकल्पात केली आहे.
या धोरणामुळे जास्तीत जास्त लोक इलेक्ट्रिक वाहनांचा वापर सुरू करतील. वाहनांमुळे पेट्रोल-डिझेलवरील अवलंबत्व कमी होणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून इलेक्ट्रिक वाहन धोरणाला प्रोत्साहन दिले जात आहे.