सौंदर्यप्रसादनांसह काही वस्तू होणार स्वस्त

सगळ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. काही वस्तू स्वस्त होणार आहेत. आज जीएसटी काऊन्सिलमध्ये त्यासंदर्भातला निर्णय घेण्यात आलाय. 

Updated: Jul 21, 2018, 10:54 PM IST
सौंदर्यप्रसादनांसह काही वस्तू होणार स्वस्त  title=
Photo: Zeebiz team

नवी दिल्ली : सगळ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. काही वस्तू स्वस्त होणार आहेत. आज जीएसटी काऊन्सिलमध्ये त्यासंदर्भातला निर्णय घेण्यात आलाय. त्यामध्ये भारतात उत्पादित होणारे सॅनिटरी नॅपकिन्स करमुक्त करण्यात आलेत. तर मिक्सर, परफ्युम्स, सौदर्यप्रसाधनं, वॉटर हिटर्स, व्हॅक्युम क्लीनर्स स्वस्त होणार आहेत. या सगळ्यावरचा कर २८ टक्क्यांवरुन १८ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आलाय. पाहुया काय काय स्वस्त होणार आहे. त्याचबरोबर ज्या उद्योजकांची उलाढाल ५ कोटींपर्यंत आहे, त्यांना आता तिमाही विवरणपत्र भरण्याची मुभा देण्यात आलीय. 

या वस्तू होणार स्वस्त

सॅनिटरी नॅपकीनव्यतिरिक्त राखी, हस्तकला, स्टोन, मार्बल, लाकडी मूर्ती, फूलझाडू आदी वस्तूंवर कोणताही कर लागणार नाही. हस्तकलेद्वारे निर्मित छोट्या वस्तूही करातून पूर्णपणे वगळण्यात आल्या आहेत. टीव्ही (२७ इंचांपर्यंत), वॉशिंग मशीन, फ्रिज, व्हिडिओ गेम्स लिथियम आयन बॅटरी, व्हॅक्यूम क्लीनरस फूड ग्राइंडर, मिक्सर, स्टोरेज वॉटर हिटर, ड्रायर, रंग, वॉटर कूलरस मिल्क कूलर, आइस्कीम कूलर, परफ्यूम, टॉयलेट स्प्रे असा वस्तूंवरील २८ टक्के इतका असलेला घटवत तो १८ टक्क्यांवर आणण्यात आला आहे. 

सौदर्यप्रसाधनांसह काही वस्तू होणार स्वस्त

वस्तू आणि सेवा करमधून सॅनिटरी नॅपकीन वगळावे, अशी मागणी गेले अनेक दिवस होत होती. अखेर आज वस्तू आणि सेवा कर परिषदेत सॅनिटरी नॅपकीन्सना वस्तू आणि सेवा करमधून वगळण्याचा निर्णय झाला. दिल्लीचे अर्थमंत्री मनीष सिसोदिया यांनी ही माहिती दिली. जीएसटी करप्रणाली जेव्हा लागू होणार होती तेव्हापासून अनेक मान्यवर महिला आणि अनेक संघटनांनी याविरोधात आवाज उठवला होता. महिलांच्या आरोग्याशी निगडीत असलेल्या वस्तूवर कर आकारला गेल्याने केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली होती.