ऑनलाइन गेमिंगबाबत केंद्र सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत; जाणून घ्या सविस्तर

GST On Online Gaming: कोरोना महामारीमुळे देशात आणि जगात इंटरनेटचा वापर गेल्या दोन वर्षांत सर्वाधिक वाढला आहे. 

Updated: Jul 26, 2022, 11:22 AM IST
ऑनलाइन गेमिंगबाबत केंद्र सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत; जाणून घ्या सविस्तर title=

मुंबई : GST On Online Gaming: कोरोना महामारीमुळे देशात आणि जगात इंटरनेटचा वापर गेल्या दोन वर्षांत सर्वाधिक वाढला आहे. विशेषत: ऑनलाइन गेमिंगमध्ये ज्याप्रकारे तेजी त्यामुळे सर्वच तंत्रज्ञान कंपन्या मोठा नफा कमावत आहेत. हे लक्षात घेऊन आता सरकारने ऑनलाइन गेमिंगवर कर लावण्याचा विचार केला आहे.

ऑनलाइन गेमिंगवर 28% GST?

मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांच्या नेतृत्वाखालील GoM ने ऑनलाइन गेमिंगवर दोन दिवस जोरदार चर्चा केली. यानंतर, GoM ने कॅसिनो आणि ऑनलाइन गेमिंग कंपन्यांच्या एकूण महसुलावर 28 टक्के जीएसटीची शिफारस केली आहे. पुढील महिन्यात GST कौन्सिलची बैठक होणार आहे, ज्यामध्ये GoM आपली शिफारस मांडू शकेल. असे झाल्यास ऑनलाइन गेमिंग लोकांसाठी विशेषतः लहान मुलांसाठी खूप महाग होईल.

GoM घेऊन संबंधितांचे मत

GoM अध्यक्ष कोनराड संगमा यांनी रविवारी गोव्यात कॅसिनो चालवणाऱ्या लोकांच्या शिष्टमंडळाशी संवाद साधला. याच्या एक दिवस आधी शनिवारीही बंगळुरूमध्ये उद्योजकांसोबत अशीच बैठक झाली. मात्र, तामिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा आणि पश्चिम बंगालमधील सदस्य या बैठकांना उपस्थित राहिले नाहीत.

पुढील महिन्यात होऊ शकतो निर्णय 

ऑनलाइन गेमिंग आणि कॅसिनोवर कर आकारण्याच्या शक्यतांचा विचार करण्यासाठी GoM च्या सदस्यांनी अनेक ठिकाणी भेटी दिल्या आणि या व्यवसायाशी संबंधित लोकांचे मत ऐकले. पुढील महिन्यात होणाऱ्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत केंद्र सरकार याबाबत मोठा निर्णय घेऊ शकते, असे मानले जात आहे.