Har Ghar Tiranga अभियानाला अभूतपूर्व यश, 'इतक्या' झेंड्यांची विक्री, पाहा कमाईचा थक्क करणारा एकूण आकडा

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने देशात 'हर घर तिरंगा' हे अभियान राबवण्यात आलं  

Updated: Aug 15, 2022, 02:56 PM IST
Har Ghar Tiranga अभियानाला अभूतपूर्व यश, 'इतक्या' झेंड्यांची विक्री, पाहा कमाईचा थक्क करणारा एकूण आकडा title=

Azadi ka Amrit Mahotsav : देशभरात स्वंतत्र्याचा अमृत महोत्सव साजार केला जात आहे. या निमित्ताने सुरु करण्यात आलेल्या हर घर तिरंगा (har ghar tiranga) अभियानाला अभुतपूर्व यश मिळालं आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्ताने देशबरात एकूण 30 करोड राष्ट्रध्वजांची विक्री झाली आहे. 

सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या अभियानामुळे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना मोठा फायदा झाला आहे. आतापर्यंत जवळपास 500 कोटींहून अधिकचा व्यवसाय झाला आहे. शिवाय 10 लाखांहून अधिक लोकांना रोजगार मिळाला आहे. 

500 करोडहून अधिकचा व्यवसाय - CAIT
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 22 जुलैला 'हर घर तिरंगा' अभियानाची घोषणा केली होती. तेव्हापासून तिरंग्याच्या विक्रित 50 पट वाढ झाली आहे. कन्फेड्रेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (CAIT) दिलेल्या माहितीनुसार यावर्षी 30 करोड राष्ट्रध्वजांची विक्रि झाली आहे. त्यामुळे जवळपास 500 कोटींचा व्यवसाय झाला आहे. 

13 ते 15 ऑगस्टदरम्यान 'हर घर तिरंगा' अभियान सुरु झालं. देशातील प्रत्येक नागरिकांने आपल्या घरावर तिरंगा फडकवण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. या अभियानाला अभुतपूर्व यश मिळालं आहे. देशवासियांमध्ये प्रचंड उत्साह पाहिला मिळाला.

20 दिवसात 30 कोटींहून अधिक राष्ट्रध्वजांची निर्मिती
स्वतंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त 'हर घर तिरंगा' हे अभियान देशभर राबवण्यात आलं.  CAIT चे राष्ट्रीय अध्यक्ष बीसी भारतीय आणि सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी एका संयुक्त निवेदनात म्हटलं आहे की, 'हर घर तिरंगा 'अभियानाने भारतीय उद्योजकांची क्षमता आणि सामर्थ्य दाखवून दिलं आहे. 

उद्योजकांनी तिरंग्याची अभूतपूर्व मागणी पूर्ण करून 20 दिवसांच्या कालावधीत 30 कोटींहून अधिक ध्वज एक विक्रम प्रस्थापित केला आहे. 

10 लाखांहून अधिक लोकांना रोजगार
केंद्र सरकारने यंदा पॉलिस्टर आणि मशीनपासून बनवलेले ध्वज फडवकवण्याची मान्यता दिली. व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार दरवर्षी 15 ऑगस्टपर्यंत 200 ते 250 कोटींच्या तिरंग्यांची विक्री होते. मात्र यंदा विक्रीचा हा आकडा 500 कोटी रुपयांपर्यंत पोहचला आहे. इतकंच नाही तर 10 लाखांहून अधिक लोकांना यामुळे रोजगार उपलब्ध झाला. 

महाराष्ट्रसह अनेक राज्यात व्यापार तेजीत
सुरत आणि दिल्लीशिवाय, महाराष्ट्र, छत्तीसगढ, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, पंजाब, तामिळनाडू, ओडिसा, बिहार, राजस्थान, झारखंड, पश्चिम बंगाल, आंध्रप्रदेश इत्यादी राज्यातही मोठ्या प्रमाणावर तिरंगा बनवण्यात आले. देशाच्या कानाकोपऱ्यात तिरंगा पोहोचवले गेले.