तब्बल 547 वर्षे जुन्या ममीची नखं, दात आजही वाढतायत; 'या' ठिकाणी असं कोणतं गुपित दडलंय?

Travel News भारतात पर्यटनाच्या दृष्टीनं एकाहून एक सरस ठिकाणं आहेत. या ठिकाणांमध्ये सर्वांच्या आवडीचं एक राज्य म्हणजे हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh). याच हिमाचल प्रदेशात दडलंय एक गुपित... 

सायली पाटील | Updated: Dec 21, 2023, 03:20 PM IST
तब्बल 547 वर्षे जुन्या ममीची नखं, दात आजही वाढतायत; 'या' ठिकाणी असं कोणतं गुपित दडलंय? title=
himachal pradesh 547 Years Old Mummy Gew monastry Lahual Spiti travel news

Travel News : पर्यटकांच्या यादीत सातत्यानं वरच्या स्थानी असणारं एक ठिकाण म्हणजे हिमाचल प्रदेश. विविध देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या या राज्यातील अनेक प्रांत देशोदेशीच्या पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतात. अशा या हिमाचल प्रदेशातील लाहौल स्पिती म्हणजे एक असा आविष्कार, जो पाहताना प्रत्येकजण भारावून जातो. स्पितीच्या खोऱ्यातील प्रत्येक लहानमोठं गाव तितकंच खास आहे. अशा या भागात एक गुपितही दडलं आहे (himachal pradesh). 

साधारण 547 वर्षे जुन्या ममीला इथं दैवतेचा मान देवून त्यांची स्पितीच्या खोऱ्यात असणाऱ्या या गावात होते. स्थानिकांच्या समजुतीनुसार ही ममी म्हणजे साक्षात देवाचं रुप आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या ममीची नखं आणि दात वाढत असल्यामुळं विज्ञानही त्यापुढं फिकं पडलं आहे. 

नेमकं कुठंय हे गाव? 

भारत- तिबेट सीमा भागात हिमाचलच्या लाहौल स्पिती (Spiti Valley) येथील गियू गावामध्ये या कैक वर्षे जुन्या ममीची पूजा होते. तिला पाहण्यासाठी देशोदेशीच्या पर्यटकांची रांग वाटते. स्थानिकांची या ममीवर प्रचंड श्रद्धा. स्पितीच्या खोऱ्यातील ताबो मॉनेस्ट्रीपासून 50 किमी दूर असणाऱ्या गियू गावाचा जगाशी असणारा संपर्क अवघ्या 4 महिन्यांचा. कारण, उर्वरित काळ इथं बर्फवृष्टीमुळं कोणालाही पोहोचणं शक्य होत नाही. 

उपलब्ध माहिती आणि मान्यतांनुसार ही ममी gew गावात येऊन ध्यानधारणा करणाऱ्या लामा सांगला तेनजिंग यांची असल्याचं सांगितलं जातं. साधनेत तल्लिन असतानाच त्यांनी प्राण त्यागल्याचं सांगत या ममीच्या बैठक अवस्थेचा इथं संदर्भ दिला जातो. जगभरात अशा अनेक ममी आहेत. पण, बसलेल्या रुपात मात्र ही जगातील एकमेव ममी असून, लामा यांनी देहत्याग केला तेव्हा ते अवघ्या 45 वर्षांचे होते अशी माहिती आहे. वैज्ञानिक चाचणीतून समोर आलेल्या तथ्यांनुसार ही ममी साधारण 547 वर्षे जुनी आहे. या ममीचे केस, नखं आणि दात वाढत असल्याचं म्हटलं गेलं तरीही त्याबाबत अनेक मतभेदसुद्धा आढळतात. 

हेसुद्धा वाचा : दिलखेच अदा, कमनीय बांधा... देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारी ही गायिका कोण? 

himachal pradesh  547 Years Old Mummy Gew monastry  Lahual Spiti travel news

1974 मध्ये आलेल्या भूकंपादरम्यान ही ममी ढिगाऱ्याखाली गेली होती. पुढं 1995 मध्ये ITBP च्या जवानांनी रस्तेबांधणीदरम्यान सापडली आणि 2009 पर्यंत ती आयटीबीपीच्या कॅम्पसमध्ये जतन करण्यात आली होती. (Gew monastery) ही ममी पाहण्यासाठी येणाऱ्यांची गर्दी पाहून अखेर गावकऱ्यांनी तिला गावात स्थान दिलं आणि ती एका स्तूपात जतन करून ठेवण्यात आली.