Rajouri Encounter : जम्मू-काश्मिरमधल्या (Jammu-Kashmir) राजौरी भागात शुक्रवारी भारतीय सेना (Indian Army) आणि दहशतवाद्यांमध्ये (Terrorists) झालेल्या चकमकीत भारताचे पाच जवान शहीद झाले. शहिदांमध्ये उत्तराखंडचे रुचिन सिंह रावत, पश्चिम बंगालमधले सिद्धांत क्षेत्री, जम्मू-काश्मिरमधले निलम सिंह आणि हिमाचल प्रदेशमधल्या के अरविंद कुमार तसंच प्रमोद नेही या जवानांचा समावेश आहे. यातले सिरमौल जिल्ह्यात राहाणारे प्रमोद नेगी सहा वर्षांपूर्वी देशसेवेसाठी स्पेशल फोर्समध्ये भरती झाले. त्यांचं पोस्टिंग जम्मू-काश्मिरमधल्या राजौरी इथं होतं. शुक्रवारी त्यांच्या निधनाच्या बातमीने ते राहात असलेल्या सिलाई क्षेत्रात दु:खाचं वातावरण पसरलं.
प्रमोदी नेगी यांचं लग्न झालं नव्हतं. आई तारा देवी, वडिल देवेंद्र नेगी, बहिण आणि लहान भाऊ असं त्यांचं कुटुंब आहे. प्रमोद नेगी यांचा भाऊदेखील लष्करात आहे. प्रमोदी नेगी यांचं पार्थिव ते राहात असलेल्या हिमाचल प्रदेशमधल्या सिलाई भागात आणण्यात आल्यानंतर संपर्ण परिसरात शोककळा पसरली. लोकांनी त्यांच्या नावाने घोषणा दिल्या.
ते शब्द ठरले अखेरचे
मिशनवर जाण्याआधी प्रमोद नेगी यांनी आपल्या आईला फोन केला होता. आपण मिशनला जात असल्याचं त्याने आईला सांगितलं. पुढचे दहा दिवस मोबाईल असेल, काळजी करुन नकोस, मिशन फत्ते करुन लवकरच घरी येईन असं त्यांनी आपल्या आईला सांगितलं होतं. तसंच त्यांनी वडिलांची आणि बहिण-भावाचीही चौकशी केली. गुरुवारी रात्री साधारण अकरा वाजता प्रमोद नेगींचं आपल्या आईशी फोनवरुन हे बोलणं झालं. पण दुर्देवाने प्रमोद नेगींचे ते शब्द अखेरचे ठरले.दुसऱ्याच दिवशी म्हणजे शुक्रवारी दुवारी बारा वाजता प्रमोद नेगी यांच्या मृत्यूची बातमी आली. मुलाच्या मृत्यूच्या बातमीने त्यांच्या शुद्ध हरपली. ज्या मुलाशी रात्री गप्पा मारल्या त्याच्या मृत्यूच्या बातमीवर त्या माऊलीचा विश्वास बसत नव्हता.
अरविंद कुमार यांचंही सर्वोच्च बलिदान
याच चकमकीत हिमाचलमधल्या कांगडा जिल्ह्यातील अरविंद कुमारही शहीद झाले. अरविंद यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार अरविंद हे लहानपणापासून साहसी आणि होतकरु होते. 2010 मध्ये ते पंजाब रेजिमेंटमध्ये भरती झाले. त्यानंतर आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर त्यांनी काही वर्षातच स्पेशल फोर्समध्ये जागा मिळवली.
राजौरी सेनेचं ऑपरेशन सुरु
चकमकीनंतर राजौरीत भारतीय सेनेचं दहशतवाद्यांविरोधात सर्च ऑपरेशन सुरु आहे. या दरम्यान केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि सेने प्रमुख जनरल मनोज पांडे जम्मू-काश्मिरमध्ये पोहचलेत. राजौरीत जाऊन ते पुंछ सेक्टरमध्ये सुरु असलेल्या कारवाईचा आढावा घेणार आहेत. राजौरीत भारतीय सेनेने एका दहशतवाद्याला ठार केलं आहे. तर एक दहशतवादी जखमी झाला आहे. भारतीय सेनेच्या कारवाईत आतापर्यंत 1 AK-56 रायफल, 9-mm पिस्तूल, 3 ग्रेनेड आणि मोठ्या प्रमाणावर काडतूसं आणि स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत.