Home Loan Calculator | कोणाला किती गृह कर्ज मिळू शकतं, हे कसे ठरतं? वाचा सविस्तर

जर तुम्ही होम लोन घेण्याचा विचार करीत असाल, तर तुम्हाला होम लोन घेण्याचे निकष काय आहेत आणि किती उत्पन्न असलेले व्यक्ती यासाठी अप्लाय करू शकतात.

Updated: Jul 27, 2021, 09:22 AM IST
Home Loan Calculator | कोणाला किती गृह कर्ज मिळू शकतं, हे कसे ठरतं? वाचा सविस्तर title=

मुंबई : जर तुम्ही होम लोन घेण्याचा विचार करीत असाल, तर तुम्हाला होम लोन घेण्याचे निकष काय आहेत आणि किती उत्पन्न असलेले व्यक्ती यासाठी अप्लाय करू शकतात. चला तर मग या सर्व मुद्द्यांबाबत माहिती घेऊ

किती उत्पन्नाची गरज
सर्वात आधी बँकेला तुम्हाला सांगावे लागेल की, तुमचे उत्पन्न किती आहे. त्यासाठी तुम्हाला सॅलरी स्लिप, ITR आणि बॅंक स्टेटमेंट द्यावे लागेल. हे सर्व डॉक्युमेंट दिल्यानंतर तुमच्या महिन्याची कमाई आणि खर्चाचे कॅल्कुलेशन करण्यात येते.

किती सेविंग करता?
इनकम कॅल्कुलेशननंतर बँक तुमची सेविंग तपासू शकते. तुमच्याकडे किती सेविंग आहे. खरेतर कोणाचीही सेविंग त्याच्या खर्चावर अवलंबून असते. परंतु एक स्टॅडर्ड कॅल्कुलेशनच्या हिशोबाने प्रत्येक व्यक्तीने कमीत कमी आपल्या उत्पन्नाच्या 30 टक्के रक्कम बचत करायला हवी.

तुम्ही याआधी किती लोन घेतले आहे?
लोन देण्याआधी बँक हे देखील बघते की, तुमच्यावर याआधीपासून कोणते लोन तर सुरू नाही ना. तुमच्यावर आधीपासूनच जर काही लोन असेल तर त्याचेही कॅल्कुलेशन बँक करीत असते.

कॅल्कुलेशन कसे होते
जर तुमचे मासिक उत्पन्न 1 लाख रुपये आहे. 20 वर्षासाठी तुम्ही कर्ज घेऊ इच्छिता, आणि त्यासाठी 7 टक्के व्याजदर आहे. तर तुम्हाला 64.49  लाख रुपयांपर्यंत होम लोन मिळू शकते. तेव्हा तुम्हाला महिन्याला 50 हजार रुपये हफ्ता बँकेत जमा करावा लागेल.
जर सध्या तुमचे इतर कोणते लोन सुरू आहे. तर मिळणारे होम लोन कमी होऊ शकते.