मधुचंद्राच्या रात्री नवऱ्याची भलतीच मागणी, दिरानेही केला अमानुष प्रकार...  एका निर्णयाने तिचं आयुष्य बदललं

success story: नवऱ्याकडून मारहाण, सासरच्यांचा जाच, सलग चार वर्ष अमानुष अत्याचार सहन केला. अखेर एक क्षण असा आला की त्यांनी सर्व झुगारुन बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. 

Updated: May 17, 2023, 07:53 PM IST
मधुचंद्राच्या रात्री नवऱ्याची भलतीच मागणी, दिरानेही केला अमानुष प्रकार...  एका निर्णयाने तिचं आयुष्य बदललं title=
husband makes abused demand brother in law tried to set her ablaze then she left in laws house and start her

नवी दिल्लीः ललिता गौतम... आज स्वतःच्या पायावर खंबीर उभी असणारी स्त्री. मात्र सामान्य गृहिणी ते स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यापर्यंतचा तिचा प्रवास सोपा नव्हता. आयुष्यात आलेल्या अनेक कठिण प्रसंगाना तिने तोंड दिले. चार वर्ष सतत नवऱ्याचा त्रास सहन केला. कधीतरी आपले दिवस पालटतील या आशेवर तिने सासरच्या मंडळींचा जाच सहन केला. लग्नाच्या पहिल्या दिवसापासूनच नवऱ्याकडून नको त्या मागण्या येऊ लागल्या. एकदा तर दिरानेच अंगावर तेल टाकून जिवंत जाळून मारण्याचा प्लान बनवला. मात्र, सगळ्या संकटावर मात करत ललिताने स्वतःच वेगळं विश्व उभं केलं 

सासरच्यांचा त्रास वाढत गेल्यानंतर ललिताने तिच्या दोन मुलींसह सासर सोडले. घर सोडल्यानंतर अडचणी खऱ्या अर्थाने वाढल्या. पण ललिता थांबल्या नाहीत. दोन मुलींची जबाबदारी घेत त्यांनी ई- रिक्षा चालवण्यास सुरुवात केली. उत्तर प्रदेशमध्ये ई-रिक्षाचा परवाना मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. ललिता यांचं वयाच्या १८व्या वर्षीच लग्न झालं. लग्नानंतर पहिल्या रात्रीच त्यांच्या नवऱ्याने त्रास देण्यास सुरूवात केली. ललित यांच्यावर दारूच्या नशेत शारिरीक अत्याचार करण्यात आले. नवऱ्याच्या इच्छा दिवसेंदिवस वाढू लागल्या. याचा मानसिक परिणाम ललिता यांच्यावर होऊ लागल्या. 

घरात सापडला महिलेचा मृतदेह, भाडेकरुवर संशय पण पुरावा सापडेना, अखेर गूढ उकललेच

दिराने केला अमानुष प्रकार

माहेरकडून पैसे घेऊन ये असा तगादा सासरच्या मंडळींकडून होऊ लागला. पतीपण रोज मारहाण करु लागला. ललिता यांना दोन मुली झाल्यानंतर हा त्रास अजूनच वाढला. मानसिक आणि शारिरीक त्रास असतानाच एक दिवस ललिता यांच्या सासूने त्यांचे दागिने चाोरले. तेव्हा संतापून ललिता पोलिसा तक्रार दाखल करायला निघत असताना त्यांच्या दिराने त्यांना अडवले व मी दागिने शोधून देतो म्हणत पुन्हा घरात घेऊन आला. घरात दागिने शोधत असताना दिराने त्यांच्यावर तेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. पण सुदैवाने तिथे त्यांची आई व भाऊ आल्याने त्यांचे प्राण वाचले आणि त्या तडक माहेरी निघून आल्या.

12 वर्षांच्या मुलीचा अपघाती मृत्यू, पण गुन्हा मात्र मैत्रिणीच्या पालकांवर दाखल, नेमकं काय घडलं?

तिने आयुष्य सावरले

माहेरी आल्यानंतर ललिताने काम शोधण्यास सुरुवात केली. दोन्ही मुलींच्या पालनपोषणाचा प्रश्न असल्याने त्यांनी मिळेल ते काम करण्याची तयारी ठेवली होती. याचकाळात त्यांची ओळख हमसफर नावाच्या एका एनजीओच्या कार्यकर्त्यांसोबत झाली. ही एनएनजीओ घरगुती हिंसाचाराला बळी पडलेल्या महिलांसाठी काम करते. एनजीओकडून ललिता यांनी ई-रिक्क्षाचे ट्रेनिंग देण्यात आले. काहि दिवसांच्या ट्रेनिंगनंतर त्यांना ई-रिक्षाचा परवाना मिळाला. आता ललिता ई-रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाला सांभाळत आहेत. आज ललितासारख्या महिला अनेक स्त्रियांसाठी प्रेरणा आहेत.