दहावी पास झालायत ? मिळतेय २० हजारांची नोकरी

फॉरेस्ट गार्ड आणि कनिष्ठ वर्ग क्लार्कसाठी अर्ज

Updated: Jul 29, 2020, 02:32 PM IST
दहावी पास झालायत ? मिळतेय २० हजारांची नोकरी title=

मुंबई : नोकरीच्या शोधात असलेल्या दहावी आणि बारावीच्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. इंडीयन काऊंसिल ऑफ फॉरेस्ट्री रिसर्च एंड एज्युकेश ( ICFRE), इंस्टीट्यूट फॉरेस्ट प्रोडक्टीव्हीटी ( IFP) ने मल्टी टास्किंग स्टाफ ( MTS), फॉरेस्ट गार्ड आणि कनिष्ठ वर्ग क्लार्क ( LDC) च्या पोस्टसाठी अर्ज मागवले आहेत. यामध्ये उमेदवार ११ सप्टेंबर २०२० च्या आधी ऑनलाईन अर्ज पाठवू शकतात. 

शेवटची तारीख - ११ सप्टेंबर २०२० 

पगार - एमटीएस (लेव्हल १) , वन संरक्षक ( लेव्हल २) 

ICFRE भरतीची माहिती 

एकूण पोस्ट - २० 

मल्टी टास्किंग स्टाफ ( एसटीएस) - १३ पोस्ट

वन रक्षक- ६ पोस्ट 

लोअर डिव्हीजन क्लर्क (एलडीसी) - १ पोस्ट 

शैक्षणिक आर्हता 

लोअर डिव्हीजन क्लर्क (LDC) - सरकार मान्यताप्राप्त बोर्डातून १२ वी परीक्षा पासचे प्रमाणपत्र. इंग्रजी ३० शब्द प्रति मिनिट टायपिंग स्पीड किंवा मॅन्युअल टायइपरायटरवर हिंदीमध्ये २५ शब्द प्रति मिनिटाचा स्पीड

मल्टी टास्किंग स्टाफ ( एमटीएस) - मान्यता प्राप्त बोर्ज किंवा मान्यताप्राप्त शाळेतून १० वी पास 

वन संरक्षक - विज्ञान शाखेतून १२ वी पास. प्रोबसन पिरियड दरम्यान मान्यताप्राप्त वनसंरक्षक ट्रेनिंग इंस्टिस्टूशनमधून फॉरेस्ट्री ट्रेनिंग कोर्स पूर्ण करण्यासाठी नोंदणी आवश्यक 

वयोमर्यादा- १८ ते २७ वर्ष 

असा करा अर्ज 

इच्छुक पात्र उमेदवार आपला अर्ज संचालक, इंस्टिट्यूट ऑफ फॉरेस्ट प्रोडक्टिविटी, १८ वी क्रॉस, लालगुटवा, एनएत-२३, गुमला रोड. रांची-८३५३०३ या पत्त्यावर पाठवू शकतात. 

११ सप्टेंबर २०२० ही शेवटची तारीख असेल.

अर्जाची किंमत ३०० रुपये असेल. यातून एससी, एसटी, पीएच तसेच महिला उमेदवारांना यातून सूट देण्यात आलीय.