नेहमीचा त्रास ऐकवायचा असेल तर 500 रुपये, एकत्र बसून रडायचे असेल तर... ऑटोचालकाची ही ऑफर ऐकाच

Viral Video:एका ऑटो चालकाने त्याच्या इंस्टाग्राम आयडी सोबत त्याच्या ऑटोच्या मागे त्याच्या कामाची जाहिरात केली. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

तेजश्री गायकवाड | Updated: Oct 20, 2024, 09:22 PM IST
नेहमीचा त्रास ऐकवायचा असेल तर 500 रुपये, एकत्र बसून रडायचे असेल तर... ऑटोचालकाची ही ऑफर ऐकाच title=
Photo Credit: @swathi_siara/Instgaram

ऑटो, ट्रक किंवा बसच्या मागे अनेक प्रकारच्या जाहिराती, मजेदार शायरी, कोट्स तुम्ही पाहिल्या असतील. जी झटकन आपले लक्ष वेधून घेते. नुकताच एका ऑटोच्या मागे लिहलेला असाच संदेश दाखवत असलेला व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ऑटोच्या मागे लिहिलेला हा संदेश पाहून तुमचे हसू नक्कीच थांबणार नाही. या ऑटोचा चालकाने आपल्या ऑटोच्या मागील बाजूस लिहून आपल्या कामाची जाहिरात करत आहे. एवढंच नाही तर त्याने त्याचा इन्स्टाग्राम आयडीही त्यात दिला आहे.

अशी जाहिरात तुम्ही कदाचित पहिल्यांदाच पहिली असेल 

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की ऑटोच्या मागे काही मज्जेशीर ओळी लिहिल्या आहेत. जेव्हा तुम्ही या ओळी वाचाल तेव्हा तुम्हाला कळेल की या ऑटो विक्रेत्याने आपल्या कामाचा प्रचार करत आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा ऑटोचालक ऑटो चालवण्यासोबत कोणते काम अजून काम करत आहे? ज्याचा तो त्याच्या ऑटोच्या मागून प्रमोशन करत आहे. हा ऑटो चालक लोकांना मदत करत आहे. जणूं घ्या की हा ऑटो चालक लोकांच्या दुःखात साथ देण्याचे काम करतो. त्याच्या ऑटोमध्ये बसून तुम्ही आरामात तुमच्या भावना व्यक्त करू शकता आणि यात तो तुम्हाला पूर्ण साथ देईल. गरज पडल्यास तो तुमचा खांदाही बनेल.

ऑटोच्या मागील बाजूची मनोरंजक जाहिरात पहा

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Swathi Siara (@swathi_siara)

ऑटो डीलरने आपल्या कामाचा प्रचार अतिशय मनोरंजक पद्धतीने केला आहे. त्यांनी त्यांच्या कामाची माहिती देणारा सर्व्हिस चार्जही लिहिला आहे. ऑटो चालकाने लिहिले - जर तुम्हाला कोणाशी बोलण्याची गरज असेल तर मी येथे आहे. नियमित समस्या - 500 रुपये, दुःखी कथा सांगण्यासाठी - 1000 रुपये आणि जर मला तुमच्यासोबत रडायचे असेल तर 2000 रुपये असतील. यासोबतच ऑटो चालकाने त्याच्या इन्स्टाग्राम हँडलचा पत्ताही लिहिला आहे. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर @SwathiSiara नावाच्या अकाऊंटवरून पोस्ट केला आहे.