गेल्या २४ तासांत ३७ लोकांचा मृत्यू, तर ९४१ नवे रुग्ण - आरोग्य मंत्रालय

देशात लॉकडाऊन-२चा आज दुसरा दिवस

Updated: Apr 16, 2020, 04:54 PM IST
गेल्या २४ तासांत ३७ लोकांचा मृत्यू, तर ९४१ नवे रुग्ण - आरोग्य मंत्रालय  title=

नवी दिल्ली : आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी माहिती दिली की, कोणतीही समस्या उद्भवू नये म्हणून सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेशांमध्ये आरोग्य सेवेबाबत गाईडलाइन्स जारी करण्यात आली आहेत. आतापर्यंत देशातील कोरोनाचे १४८९ रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या २४ तासांत ३७ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर उपचारानंतर ११३ रुग्ण बरे झाले आहेत. लव्ह अग्रवाल यांनी सांगितले की, ३२५ जिल्हे असे आहेत जिथे कोणताही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही. भारतात कोरोनाचा रुग्ण बरा होण्याचं प्रमाण १२ टक्के आहे. गेल्या २४ तासांत ९४१ नवे रुग्ण आढळले आहेत.

ICMRचै वैज्ञानिक रमन गंगाखेडकर यांनी म्हटलसं की, एंटीबॉडी टेस्ट प्रत्येक क्षेत्रा करुन फायदा नाही. ही टेस्ट हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणीच करणं फायद्याचं ठरेल. देशात आतापर्यंत २ लाख ९० हजाराहून अधिक जणांची तपासणी झाली आहे. आमच्याकडे ८ आठवड्यांपर्यंत टेस्ट करण्यासाठी किट उपलब्ध आहेत.