Explainer : गांधी घराण्यातील तीन व्यक्ती संसदेत, प्रियंका गांधी ठरणार गेम चेंजर

India Politics : लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधी रायबरेली आणि वायनाड मतदारसंघातून विजयी झाले. नियमानुसार एक मतदारसंघ ठेवावा लागतो. यानुसार राहुल गांधी यांनी रायबरेली मतदारसंघ आपल्याकडे ठेवला असून वायनाड मतदार संघात प्रियंका गांधी यांना उमेदवार जाहीर केलीय.

राजीव कासले | Updated: Jun 18, 2024, 09:20 PM IST
Explainer : गांधी घराण्यातील तीन व्यक्ती संसदेत, प्रियंका गांधी ठरणार गेम चेंजर title=

India Politics : अखेरीस गांधी घराण्यातील तीन व्यक्ती संसदेत प्रतिनिधीत्व करतील. यातील दोन जागा असतील त्या उत्तरेच्या तर एक जागा असेल दक्षिणेची. प्रियंका गांधीच्या (Priyanka Gandhi) निवडणुकीच्य़ा रिगणात उतरण्याची घोषणा करताना  राहुल गांधी यांनी रायबरेली (Raebareli) आणि वायनाड (Wayanad) या दोन मतदार संघात आता दोन दोन  खासदार मिळतील असं म्हटलं होतं . याचाच अर्थ असा की दोघं बहिण-भाऊ आता देशाच्या राजकारणात सक्रिय असतील. एक गांधी उत्तरेचं राजकारण बघेल तर दुसरा गांधी  दक्षिणेचं.

राहुल गांधी यांना रायबरेली आणि वायनाड यापैकी एकाची निवड करायची होती. त्यांनी रायबरेलीची जागा आपल्याकडे ठेवण्याचा निर्णय घेतलाय. आता वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीतून प्रियंका गांधी राजकारणात पदार्पण करतील.

गांधी कुटुंबाचं दक्षिण कनेक्शन
गांधी परिवाराचं दक्षिण कनेक्शन राजकारणात नवीन नाही. वायनाडमधून आधी राहुल गांधी यांनी निवडणूक लढवणं आणि नंतर तो मतदारसंघ प्रियंकासाठी देणं हा या कनेक्शनचाच एक भाग आहे. आणीबाणीनंतर 1977 ची निवडणूक इंदिरा गांधी  रायबरेलीमधून हरल्या होत्या. मात्र 1978 मध्ये कर्नाटकातल्या चिकमंगळूर जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत मात्र त्या जिंकल्या. एवढचं नव्हे तर 1980 च्या लोकसभा निवडणुकीत त्या रायबरेली आणि  आंध्रप्रदेशमधील मेंढक या दोन जागांवरून निवडणुक लढल्या होत्या. या दोनही जागांवर विजयी झाल्यानंतरही  दक्षिणेतल्या जनतेचा विश्वास कायम राखण्यासाठी त्यांनी रायबरेली सोडून मेंढकच्या जागेला अधिक पसंती दिली.

पुढ् 1999 मध्येही सोनिया गांधी कर्नाटकातल्या बेल्लारी आणि अमेठी या दोन जागांवर निवडणूक  लढल्या आणि दोनही जांगावर विजयी झाल्या. गांधी परिवारासाठी दाक्षिणात्यांनी नेहमीचं मदतीचा हात दिला. ती परंपरा यावेळेही कायम होती. दक्षिणेच्या एकूण 130 जांगापैकी एकूण 42 जागांवर कॉंग्रेस विजयी झाली. 

काँग्रेसची रणनिती
प्रियंकाला दक्षिणेतून पहिल्यांदा संसदेत नेण्यामागची कॉंग्रेसची रणनीती स्पष्ट  आहे. केरळमध्ये सलग दुसऱ्यांदा कॉंग्रेसने 20 पैकी 15-14 जागा जिंकल्या आहेत. हा आपला गड कायम राखत प्रियंकाच्या मदतीने तामिळनाडू, तेलंगणा आणि कर्नाटकमधील कॉंग्रेस कार्यकर्त्यांचं मनोबल उंचावायचं ही यामागची रणनीती आहे. येणाऱ्या केरळ विधानसभा निवडणुकीत जर कॉंग्रेसचा विजय झाला तर काही गणित निश्चितपणे बदलतील. आंध्रप्रदेश सारखं राज्य जिथे एकेकाळी कॉंग्रेसचा परंपरागंत मतदार  होता तिथला  आपला जनाधार पुन्हा मिळवणं ही कॉंगेसला शक्य होईल. आणि जर हे प्रत्यक्षात आलं तर प्रियंका गांधी ही खरोखरची गेम चेंजर ठरेल.

गांधी कुटुंबाचं दक्षिण प्रेम
1978 - चिकमंगळुर (इंदिरा गांधी)

1980 - मेडक (इंदिरा गांधी)

1999 - बेल्लारी (सोनिया गांधी)

2019 - वायनाड (राहुल गांधी)

2024 - वायननाड पोट निवडणूक (प्रियंका गांधी)