वायुसेनेचं 'सी-१७ ग्लोबमास्टर' अरुणाचलच्या तुतिंगमध्ये दाखल!

भारतीय वायुसेनेचं सर्वात मोठं अवजड वस्तू वाहक विमान 'सी - १७ ग्लोबमास्टर' ऐतिहासिकरित्या मंगळवारी अरुणाचलमध्ये दाखल झालंय. 

Shubhangi Palve Updated: Mar 14, 2018, 12:27 PM IST
वायुसेनेचं 'सी-१७ ग्लोबमास्टर' अरुणाचलच्या तुतिंगमध्ये दाखल! title=

नवी दिल्ली : भारतीय वायुसेनेचं सर्वात मोठं अवजड वस्तू वाहक विमान 'सी - १७ ग्लोबमास्टर' ऐतिहासिकरित्या मंगळवारी अरुणाचलमध्ये दाखल झालंय. 

अरुणाचलच्या तुतिंगमध्ये हे विमान उतरलं. हा भाग चीनच्या सीमेलगत आहे. वायुसेनेच्या एका प्रवक्त्यानं दिलेल्या माहितीनुसार, 'सी १७ ग्लोबमास्टर विमान तुतिंगच्या अॅडव्हान्स्ड लॅन्डिंग ग्राऊंडमध्ये उतरलं'.

विमानाची विशेषत: आणि पायलटच्या उत्कृष्ट कौशल्यामुळे हे मिशन पूर्णत्वास आल्याचंही त्यांनी म्हटलंय. अमेरिका निर्मित या विमानाला चीनच्या सीमेलगत उतरवणं अधिक महत्त्वपूर्ण आहे. कारण वायुसेना सीमावर्ती भागात आपली बाजू मजबूत करत आहे.  
 
सेना प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी मंगळवारी भारत आणि चीनचा वार्षिक सैन्य अभ्यास लवकरच पूर्ण होईल असं म्हटलंय. डोकलाम वादानंतर दोन्ही देशांच्या संबंधात कटुत्व आलं होतं, परंतु आता मात्र परिस्थिती सुधारतेय, असंही त्यांनी म्हटलंय.