भारत-चीन तणावादरम्यान भारतीय सैन्य कॉम्बेट गाड्यांमध्ये नाईट व्हिजन करणार अपग्रेड

लडाखमध्ये चीनसोबत सीमेवर तणावाची परिस्थिती कायम आहे.

Updated: Sep 8, 2020, 09:29 AM IST
भारत-चीन तणावादरम्यान भारतीय सैन्य कॉम्बेट गाड्यांमध्ये नाईट व्हिजन करणार अपग्रेड title=

नवी दिल्ली : लडाखमध्ये चीनसोबत सीमेवर तणावाची परिस्थिती कायम आहे. दरम्यान, चीनशी सामना करण्यासाठी भारतीय सैन्य सर्व तयारी करत आहे. तणावादरम्यान, भारतीय सेना आता हल्ला करणारी वाहने अपग्रेट करत आहे. जी वाहने रात्री काम करू शकत नाहीत. त्यांच्यात आता नाईट व्हिजन लागू केले जाईल, जेणेकरून मध्यरात्रीदेखील ते वापरता येतील.

वृत्तसंस्था पीटीआयच्या माहितीनुसार, सैन्याकडून दिलेल्या निवेदनानुसार, सैन्याने देशांतर्गत कंपन्यांकडून डेमो मागवला आहे, तसेच ज्या कोणालाही काम करण्याची इच्छा असेल त्यांना काम पुढे दिले जाऊ शकते. BMP-2/2K इन्फेंटरी कॉम्बेट गाड्यांना अपग्रेड केले जाणार आहे.

१९८५ मध्ये ही वाहने भारतीय सैन्यात दाखल झाली होती, तेव्हापासून ते भारतीय सैन्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावत आहेत. सैन्याने दिलेल्या माहितीनुसार ही सर्व वाहने नाईट ब्लाइंड आहेत, अशा परिस्थितीत नाईट व्हिजनला अपग्रेड करावे लागेल.

सैन्याचे म्हणणे आहे की सैनिकांना बर्‍याचदा सीमेवर अशा प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागतो, अशा परिस्थितीत या धोक्याचा प्रतिकार करण्यासाठी अपग्रेडची आवश्यकता असते. यासह, स्वयंचलित लक्ष्य ट्रॅकर, फायरिंग कंट्रोल सिस्टम यासारख्या सुविधा देखील यात समाविष्ट केल्या जातील.

गेल्या अनेक दिवसांपासून लडाख सीमेवर तणाव कायम आहे. अशा परिस्थितीत भारतीय सैन्य आधीच तयारी करीत आहे, जेणेकरून परिस्थिती आणखी बिकट झाली तर त्याचा सामना करता येईल.

सीमेवर चीनकडून सतत उकसवण्याचा प्रयत्न सुरु आहे. चीन सैन्य सतत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहे. काल रात्री पँगोंगमध्ये फायरिंग देखील करण्यात आली.