नवी दिल्ली : कुलभूषण जाधव यांच्या पत्नी आणि आई यांनी सोमवारी पाकिस्तानमधील भेटीनंतर परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत धक्कादायक माहिती जाहीर केली. परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे की, भेटीदरम्यान भारतीय संस्कॄती आणि धार्मिक भावनांचा मान राखला गेला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तानकडून मनमानी करण्यात आल्याचे दिसून आले आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रवीश कुमार म्हणाले की, भेटीआधी कुलभूषण जाधव यांच्या पत्नी आणि आईच्या बांगड्या, टीकल्या आणि मंगळसूत्र काढण्यास सांगितले. इतकेच नाहीतर कपडेही बदलवण्यात आले. तसेच त्यांच्या चपलाही परत करण्यात आल्या नाहीत.
याआधी कुलभूषण जाधव यांच्या परीवाराने दिल्लीत सुषमा स्वराज यांची भेट घेतली. २५ डिसेंबरला पाकिस्तानमध्ये कुलभूषण यांची भेट घेतल्यावर त्यांची आई आणि पत्नी दिल्लीत परतले. तेव्हा सर्वातआधी त्यांनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेतली. अशी माहिती आहे की, जाधव यांच्या कुटुंबियांनी जाधव यांच्यासोबत झालेली सर्व बातचीत परराष्ट्र मंत्र्यांना सांगितली.
जाधव यांच्या कुटुंबियांनी परराष्ट्र मंत्र्यांना सांगितले की, इस्लामाबादमध्ये त्यांच्यासोबत काय झाले, कसा व्यवहार करण्यात आला, काय बोलणं झालं आणि कुलभूषण त्यांच्यासोबत काय बोलले. परराष्ट्र सचिव एस जयशंकर आअणि परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रवीश कुमार हे सुद्धा सुषमा स्वराज यांच्या निवासस्थानी उपस्थित होते.
#WATCH MEA spokesperson Raveesh Kumar on meeting of #KulbhushanJadhav's mother and wife with Jadhav in Islamabad pic.twitter.com/O6HkKoc7WK
— ANI (@ANI) December 26, 2017
भेटीआधीचे आणि नंतरच्या फोटोंमध्ये स्पष्ट दिसत आहे की, इस्लामाबाद पोहोचल्यानंतर जाधव यांच्या आई आणि पत्नीचे कपडे बदलण्यात आले. भेटीआधीच्या फोटोमध्ये त्यांच्या आईने पांढ-या रंगाची साडी परीधान केली होती आणि त्यांनी एक शॉलही घेतली होती. तर त्यांच्या पत्नीने लाल-पिवळ्या रंगाचा सूट परीधान केला होता आणि एक शॉल घेतली होती. भेटीनंतर दोघींही याच कपड्यात दिसल्या. पण बंद खोलीत भेट झाली तेव्हा दोघींचीही वेशभूषा वेगळी होती.
काचेची भींत आडवी ठेवून भेटीबाबत प्रश्न विचारल्यावर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता फैजल यांच्याकडून सांगण्यात आले की, आधीच सांगण्यात आले होते की, सुरक्षेसाठी म्हणून भेट काचेची भींत मधे ठेवून घडवली जाणार. तेच जाधव यांना काऊन्सेलर अॅक्सेसच्या प्रश्नावर फ़ैजल म्हणाले की, हा काऊंन्सेलर अॅक्सेस नव्हता. ही केवळ ३० मिनिटांची भेट होती. जी जाधव यांच्या म्हणण्यानुसार १० मिनिटे वाढवण्यात आली.
या भेटीच्या पद्धतीबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मानवीय आधारावर एक आई आपल्या मुलाला आणि एक पत्नी आपल्या पतीला सरळ भेटू दिले नाही. ते ऎकमेकांसमोर नक्कीच बसले होते, पण त्यांच्यामध्ये एक काचेची भींत होती. त्यांच्यात संवाद साधण्यासाठी इंटरकॉमची व्यवस्था करण्यात आली होती.
गेल्यावर्षी मार्चमध्ये अटक करण्यात आल्यानंतर जाधव कुटुंबियांची ही त्यांच्यासोबत पहिली भेट आहे. पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या भेटीच्या व्हिडिओमध्ये खुलासा करण्यात आला आहे की, कुलभूषण जाधवसोबत अत्याचार झाले आहेत. सूत्रांच्या हवाल्याने सांगितले जात आहे की, शिपिंग कंटेनरमध्ये कुलभूषण जाधव यांची भेट परिवारासोबत घडवण्यात आली. असेही बोलले जात आहे की, भेटीदरम्यान शिपिंग कंटेनर एका उंच बिल्डींगच्या बेसमेंटमध्ये ठेवण्यात आला होता. विशेषज्ञांचे म्हणने आहे की, शिपिंग कंटेनरमध्ये कैद्यांना तेव्हाच ठेवलं जातं जेव्हा त्यांच्यावर अत्याचार करायचे असतात.