शीना बोराचा सांगाडा गायब? आरोपी Indrani Mukerjea चा धक्कादायक खुलासा, म्हणते 'सीबीआयने मुद्दामहून...'

Indrani Mukerjea allegations on CBI : सीबीआयने जी हाडे शीना बोराचे अवशेष (Sheena Bora murder case) असल्याचे घोषित केले होते, ती गायब हाडे आता गायब असल्याने इंद्रानी मुखर्जीने धक्कादायक खुलासा केला आहे.

सौरभ तळेकर | Updated: Jun 16, 2024, 08:37 PM IST
शीना बोराचा सांगाडा गायब? आरोपी Indrani Mukerjea चा धक्कादायक खुलासा, म्हणते 'सीबीआयने मुद्दामहून...' title=
Indrani Mukerjea serious allegations on CBI Sheena Bora murder case

Sheena Bora murder case : देशाला हादरवून सोडणाऱ्या शीना बोरा हत्याकांडात नवा ट्विस्ट आला आहे. सीबीआयच्या ताब्यातून शीना बोराचा सांगाडा गायब झाल्यानंतर या प्रकरणातील आरोपी इंद्रानी मुखर्जी हिनं सीबीआयवर गंभीर (Indrani Mukerjea allegations on CBI) आरोप केलेत. 2012 मध्ये कोणताही सांगाडा सापडलाच नव्हता. सांगाडा सापडला ही एक रचलेली कथा होती. मला गोवण्यासाठी खोटे पुरावे सादर करण्यात आले, असा आरोप इंद्रानी मुखर्जीनं केलाय. शिना बोरा जिवंत असल्याचा पुनरुच्चारही तिनं केला. त्यामुळे आता इंद्रानी मुखर्जीच्या आरोपाने अनेकांना धक्का बसला आहे. 

नेमकं काय म्हणाली Indrani Mukerjea?

माझ्या वैयक्तिक दृष्टिकोनातून, मला असे वाटते की मे २०१२ मध्ये कोणत्याही सांगाड्याचे अवशेष सापडले नाहीत. ही सर्व एक रचलेली कथा होती कारण सीबीआय सारख्या प्रमुख एजन्सीच्या ताब्यातून हा महत्त्वपूर्ण पुरावा गायब होऊ शकतो हे स्वीकारणे फार कठीण आहे. त्यामुळे पुरावा कधीच अस्तित्वात नव्हता असं मला वाटतं, असा खळबळजनक आरोप इंद्रायणी मुखर्जीने केला आहे.

अनेक प्रकारच्या एजन्सी आणि संस्थांनी केलेल्या या फेरफार, खोडसाळपणाच्या तपासामुळे मला असं वाटतंय, आणि मला वाटते की तपासच अर्धवट होता आणि प्रत्येकजण माझ्यावर आरोप लावण्यासाठी घाई करत होता कारण त्यांची वेळ संपत होती. आवश्यक लोकांची पुन्हा चौकशी केली पाहिजे, अशी मागणी देखील इंद्रायणी मुखर्जीने केली आहे.

डीएनए तज्ञाने छापलेले निर्देशांक कापून डीएनए अहवाल तयार करण्यासाठी त्यांना का बदलावे लागले? त्याची कोठडीत चौकशी झाली पाहिजे. मला असं वाटतं की राहुल मुखर्जी हा माझ्या मुलीचा मंगेतर असल्याचा दावा करत असल्यानं आणि त्यानं तिला शेवटचं पाहिले होतं असा दावा केला असल्यानं, मला वाटतं की त्याला कोठडीत चौकशीची गरज आहे, असं इंद्रायणी मुखर्जीने म्हटलं आहे.