IAS Rohini Sindhuri Vs IPS D Roopa : देशातील एका राज्यात दोन सरकारी पॉवरफुल महिला अधिकाऱ्यांमध्ये चांगलाच वाद पेटलाय. या वादाची संपुर्ण देशभर चर्चा आहे. विशेष म्हणजे दोन उच्च पदावरील व्यक्ती आपापसात भिडल्याची ही पहिलीच घटना असावी. या घटनेने संपूर्ण देशाचे वातावरण तापले आहे. नेमका हा घटनाक्रम काय आहे? आणि जनतेचे काम सोडून या महिला अधिकारी आपापसात का भिडल्यात? हे जाणून घेऊयात.
कर्नाटकातील महिला आयपीएस अधिकारी डी रूपा (IPS D Roopa) आणि आयएएस अधिकारी रोहिणी सिंधुरी (IAS Rohini Sindhuri) या दोन महिला अधिकाऱ्यांमधील वाद टोकाला पोहोचला आहे. डी रूपा यांनी रोहिणी सिंधुरीचे काही खाजगी फोटो सोशल मीडियावर शेअर करत गंभीर आरोप केले होते. त्यानंतर या वादाला तोंड फूटले होते.
आयपीएस अधिकारी डी रूपा (IPS D Roopa)यांनी फेसबूकवर आयएएस अधिकारी रोहिणी सिंधुरी (IAS Rohini Sindhuri)यांचे काही खाजगी फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत त्यांनी सिंधुरी यांच्यावर गंभीर आरोप केला. त्या या पोस्टमध्ये म्हणाल्या की, सिंधुरीने तिची खाजगी फोटो तीन पुरुष आयएएस अधिकाऱ्यांना पाठवल्याचा आरोप केला.यासह सिंधुरी यांच्यावर 19 गंभीर आरोप केले.
डी रूपा (IPS D Roopa) त्यांच्या फेसबूक पोस्टमध्ये म्हणतात की, 'अशी छायाचित्रे सामान्य वाटू शकतात. पण, एखाद्या महिला आयएएस अधिकाऱ्याने एक किंवा दोन किंवा तीन पुरुष आयएएस अधिकाऱ्यांना अशी अनेक छायाचित्रे पाठवली तर त्याचा अर्थ काय? असा सवाल रूपा यांनी उपस्थित केला. तसेच ही त्याची खाजगी बाब असणार नाही, आयएएस सेवा आचार नियमानुसार हा गुन्हा आहे. कोणतीही तपास यंत्रणा या चित्रांची सत्यता पडताळू शकते. सलून हेअरकट, उशी घेऊन झोपताना काढलेले चित्र काही लोकांना सामान्य वाटू शकते. नाहीतर फोटोतील अवस्था खुप काही सांगते अशा त्या म्हणाल्या आहेत.
डी रूपा (IPS D Roopa) यांच्या गंभीर आरोपानंतर आयएएस अधिकारी रोहिणी सिंधुरी (IAS Rohini Sindhuri) यांनी रविवारी एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात त्यांनी कायदेशीर कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे.'माझी बदनामी करण्यासाठी त्यांनी सोशल मीडिया आणि व्हॉट्सअॅप स्टेटसवरून माझ्या फोटोंचे स्क्रीनशॉट गोळा केले आहेत.हे फोटो मी काही अधिकार्यांना पाठवल्याचा आरोप त्यांनी केला असल्याने त्यांची नावे जाहीर करावीत, असे थेट आव्हानच सिंधुरी यांनी डी रुपा यांना दिले आहे. यावर आता सिंधूरी यांचे आव्हान डि रूपा घेतात का हे पाहावे लागणार आहे.
दरम्यान आयपीएस अधिकारी रूपा (IPS D Roopa) यांनी प्रशासनाला सिंधुरीबद्दल (IAS Rohini Sindhuri) सहानुभूती दाखवू नये आणि तिच्यावरील आरोपांची चौकशी करण्याची विनंती केली आहे. या प्रकरणात आता पुढे काय होते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.