इस्त्रीवाल्याचा संतापजनक प्रकार! गुळण्या घेत कपड्यावर पाणी टाकून इस्त्री, धक्कादायक Video Viral

एक इस्त्रीवाला पाण्याच्या गुळण्या घेऊन कपड्यांवर तोंडातील पाणी स्प्रे करत असल्याचा संतापजनक प्रकार दिसत आहे. 

Updated: Jul 7, 2022, 06:44 PM IST
इस्त्रीवाल्याचा संतापजनक प्रकार! गुळण्या घेत कपड्यावर पाणी टाकून इस्त्री, धक्कादायक Video Viral title=

Viral Video: गेल्या काही दिवसात भाकरी आणि भाजी बनवताना त्यावर थुंकत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाले होते. यानंतर पोलिसांनी संबंधित व्यक्तींचा शोध घेत कारवाई पण केली. इतकं होऊनही काही लोक यातून बोध घेत नाहीत. आता असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. आपल्याला कायम स्वच्छ कपडे घालून टापटीप राहायला आवडतं. यासाठी कपडे स्वच्छ धुण्यासोबत कपड्यांना इस्त्री केली जाते. कपड्यांना इस्त्री कडक व्हावी आणि चुरगळेला कपडा व्यवस्थित व्हावा यासाठी इस्त्रीवाला त्यावर पाणी शिंपडतो. यासाठी इस्त्रीवाला स्प्रे किंवा हाताने कपड्यावर पाणी शिंपडतात, हे तुम्ही पाहिलं असेल. पण व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहून तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल. या व्हिडीओत एक इस्त्रीवाला पाण्याच्या गुळण्या घेऊन कपड्यांवर तोंडातील पाणी स्प्रे करत असल्याचा संतापजनक प्रकार दिसत आहे. यामुळे स्वच्छ आणि टापटीप कपडे घालण्याच्या विश्वासावर 'पाणी पडलं' असंच समजा. 

व्हायरल व्हिडीओत एक इस्त्रीवाला पांढऱ्या रंगाच्या कपड्यावर तोंडाने पाणी स्प्रे करताना दिसत आहे. पातळ्यातलं पाणी तोंडात घेऊन कपड्यावर टाकताना दिसत आहे. इस्त्रीवाल्याकडे जुन्या काळातील कोळश्यावर चालणारी इस्त्री असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत. तसेच व्हिडीओखाली आपल्या संतप्त प्रतिक्रिया नोंदवत आहेत. नेमका हा प्रकार कुठचा आहे, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही.