close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

'पठाणकोट रेल्वे स्थानक उडवण्याचे आयएसआयचे प्लानिंग'

 आयएसआय पठाकोट रेल्वे स्थानक उडवण्याचे प्लानिंग करत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

Updated: May 27, 2019, 04:21 PM IST
'पठाणकोट रेल्वे स्थानक उडवण्याचे आयएसआयचे प्लानिंग'

पठाणकोट : जम्मू पाकिस्तानातील गुप्तचर संस्था आयएसआय पठाकोट रेल्वे स्थानक उडवण्याचे प्लानिंग करत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. ही बाब गांभीर्याने घेत फिरोजपूर रेल्वेच्या अख्त्यारित येणाऱ्या स्थानकांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. जीआरपी पठानकोटने अधिकाऱ्यांना हाय अलर्ट जारी करत बेवारस वस्तूंवर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. रेल्वे स्थानकावर बसलेल्या प्रवाशांचा तपास केला जात आहे. तसेच जम्मुहून रवाना होणाऱ्या रेल्वे गाड्यांची तपासणी होत आहे.

फिरोजपूर डिव्हीजनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना एक पत्र मिळाले आहे. यामध्ये पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआय पठाणकोट शहर आणि रेल्वे स्थानक उडवणार असल्याचे म्हटले आहे. रेल्वे स्थानकावरील पार्किंग एरियावर नजर ठेवले जावेत असे निर्देश जीआरपीने जारी केले आहेत. तसेच रेल्वे स्थानकावर देखील वारंवार अनाऊसमेंट केली जात आहे. कोणत्याही प्रवाशाला संशयित वस्तू सापडल्यास 182 नंबर वर माहिती देण्याची सूचना देण्यात येत आहे.