डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी भारतात येणार

२८ नोव्हेंबरला हैदराबादमध्ये ग्लोबल एन्टरप्रिनरशिप संम्मेलनाला सुरुवात होणार आहे. या संम्मेलनासाठी केवळ भारतातच नाही तर जगभरातील लोकांमध्ये उत्साह आहे. 

Updated: Nov 14, 2017, 01:44 PM IST
डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी भारतात येणार title=

नवी दिल्ली : २८ नोव्हेंबरला हैदराबादमध्ये ग्लोबल एन्टरप्रिनरशिप संम्मेलनाला सुरुवात होणार आहे. या संम्मेलनासाठी केवळ भारतातच नाही तर जगभरातील लोकांमध्ये उत्साह आहे. 

संम्मेलनाला डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी हिच्यासह जगभरातील 40 देशांमधील दिग्गज आणि सीईओ सहभागी होणार आहेत. अमेरिका दौऱ्यात यासाठी पंतप्रधान मोदी यांनी त्यांना आमंत्रण सुद्ध दिलं होतं.

अमेरिकेच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या परिषदेत हाय ग्रोथ इंडडस्ट्री - हेल्थ अँड लाईफ सायन्स (आरोग्य आणि जीवन विज्ञान), डिजिटल इकॉनामी अँड फाइनॅन्शियल टेक्नॉलॉजी (डिजिटल अर्थव्यवस्था आणि आर्थिक तंत्रज्ञान), ऊर्जा आणि पायाभूत सुविधा, माध्यम आणि मनोरंजन यांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे.