'जल जीवन मिशन' योजने अंतर्गत १ लाखांहून अधिक घरांत नळाद्वारे पाणी - पंतप्रधान मोदी

गेल्या वर्षी याच दिवशी पंतप्रधान मोदींनी 'जल जीवन मिशन' योजनेची घोषणा  केली होती.  

Updated: Aug 15, 2020, 08:55 AM IST
'जल जीवन मिशन' योजने अंतर्गत १ लाखांहून अधिक घरांत नळाद्वारे पाणी - पंतप्रधान मोदी  title=

नवी दिल्ली : सगल सात वर्ष स्वातंत्र्यदिना दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करत आहेत. गेल्या वर्षी याच दिवशी पंतप्रधान मोदींनी 'जल जीवन मिशन' योजनेची घोषणा  केली होती.  मोदींच्या या योजने अंतर्गत आज १ लाखांहून अधिक घरांत नळाद्वारे पाणी पोहोचवलं जात आहे. ‘जल जीवन मिशन’तंर्गत दोन कोटी पेक्षा जास्त कुटुंबांना स्वच्छ पाणी उपलब्ध करुन दिले जात आहे. 

मोदी म्हणाले, 'गेल्या वर्षी याच दिवशी 'जल जीवन मिशन' योजनेची घोषणा केली होती. त्यामुळे मला समाधान आहे या योजने अंतर्गत १ लाखांहून अधिक घरांत नळाद्वारे पाणी पोहोचवलं जात आहे. शहरांपासून दूर राहणाऱ्या आदिवासी भागांपर्यंत देखील ही योजना पोहोचली आहे. या योजनेचा फायदा देशातील दोन कोटी पेक्षा जास्त कुटुंबांना होत आहे.  ' असं मोदी म्हणाले. 

त्याचप्रमाणे गरीब साथीदारांना आपल्या गावातच रोजगार देण्यासाठी 'गरीब कल्याण रोजगार योजना सुरू करण्यात आली. राशनकार्ड असेल किंवा नसेल ८० कोटींहून अधिक लोकांना मोफत अन्न व्यवस्था करण्यात आली. शिवाय ६ कोटी कुटुंबांना मोफत गॅस सिलिंडर पुरवण्यात आलं असल्याचं त्यांनी सांगितलं

पायाभूत सुविधांवर १०० लाख कोटी रुपयांहून अधिक खर्च करण्याच्या दिशेनं देश पुढे वाटचाल करत असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. 'मेक इन इंडिया'सोबत 'मेक फॉर वर्ल्ड' अंतर्गत आज मोठ-मोठ्या कंपन्या भारताकडे वळत आहे.