दहावी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची संधी, इथे करा अर्ज

तंत्रज्ञ, ड्राफ्टमॅन, तांत्रिक सहाय्यक आणि ग्रंथालय सहाय्यकांची पदं रिक्त 

Updated: May 3, 2018, 01:39 PM IST
दहावी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची संधी, इथे करा अर्ज  title=

नवी दिल्ली : इस्रो (इंडियन स्पेस रिसर्च ऑरगनायझेशन) मध्ये तंत्रज्ञ, ड्राफ्टमॅन, तांत्रिक सहाय्यक आणि ग्रंथालय सहाय्यकांची पदं रिक्त आहेत. यासाठी इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्यापूर्वी सर्व आवश्यक रोजगार संबंधित माहिती वाचून अर्ज करा.

रिक्त पदांची नावे

तंत्रज्ञ, मसुदा, तांत्रिक सहाय्यक आणि ग्रंथालय सहाय्यक

पदांची संख्या

पदांची एकूण संख्या ५२ आहे.

पात्रता 

तंत्रज्ञ / ड्राफ्टमेन: कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेकडून दहावी पास. तसेच, आयटीआय / एनटीसी / एनएसी पाठ्यक्रमांचे प्रमाणपत्र

तांत्रिक सहाय्यक

या पदासाठी कोणत्याही स्ट्रीममधील डिप्लोमा

लायब्ररी सहाय्यक

उमेदवाराने मास्टर डिग्री ग्रंथालय / विज्ञान / ग्रंथालय आणि माहितीशास्त्र या बरोबर बॅचलर पदवी आवश्यक

वय मर्यादा

उमेदवार ३५ वर्षे वयापेक्षा जास्त नसावा.

अर्ज शुल्क

सामान्य उमेदवारासाठी २५० रुपये, एससी, एसटी आणि पीडब्ल्यूडी उमेदवारांना सवलत.

महत्त्वाची तारीख

ऑनलाइन फॉर्म भरण्याची अंतिम तारीख ११ मे

निवड प्रक्रिया

लेखी परीक्षा आणि मुलाखत

पगार 

तंत्रज्ञ / ड्राफ्टमॅन: रु २१,७०० रुपये 

तांत्रिक सहाय्यक / ग्रंथालय सहाय्यक: ४४,९०० रुपये