Karnataka Assembly Election : काँग्रेसची पहिली यादी जाहीर, कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी यांची घोषणा

Karnataka Assembly Election : कर्नाटक विधानसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. काँग्रेसने कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी तब्बल 124 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. पहिल्या यादीत माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि दिग्गज नेते डीके शिवकुमार यांच्या नावांला पसंती देण्यात आली आहे. दरम्यान, भाजपमधून काही नेते काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याने या निवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळणार आहे.

Updated: Apr 21, 2023, 03:43 PM IST
Karnataka Assembly Election : काँग्रेसची पहिली यादी जाहीर, कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी यांची घोषणा  title=

Karnataka Assembly Election : कर्नाटक विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. (Political News)  काँग्रेसने कर्नाटक विधानसभा निवडणूक 2023 साठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. काँग्रेसकडून तब्बल 124 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. काँग्रेस उमेदवारांच्या पहिल्या यादीत माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि दिग्गज नेते डीके शिवकुमार यांच्या नावांचा समावेश आहे. 

कर्नाटक राज्यात विधानसभेच्या एकूण 224 जागा आहेत. कर्नाटकात सध्या भाजपची सत्ता आहे. मात्र यावेळी कल काँग्रेसच्या बाजुने दिसून येत आहे. त्यामुळे काँग्रेसकडून जोरदार मोर्चेबांधणी करण्यात आली आहे. काँग्रेसला पुन्हा एकदा कर्नाटक सरकारमध्ये  स्थापन करण्यात यश येईल, असा दावा या पक्षाकडून करण्यात आला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र, त्यांच्याकडे बहुमत नव्हते. त्यानंतर राज्यात काँग्रेस आणि जेडीएस आघाडीने सरकार स्थापन केले. मात्र, हे युतीचे सरकार 5 वर्षे टिकू शकले नाही आणि भाजप पुन्हा सत्तेत आले.

काँग्रेसच्या यादीत या दिग्जांची नावे

कर्नाटक विधानसभेसाठी काँग्रेसकडून अनेक इच्छुक उमेदवार होते. मात्र, काँग्रेसने कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना वरुणा मतदारसंघातून आणि ज्येष्ठ नेते डीके शिवकुमार यांना कनकापूरमधून उमेदवारी दिली आहे. याशिवाय रामदुर्गमधून अशोक एम, हुक्केरीतून ए.बी.पाटील आणि खानापूरमधून डॉ.अंजली काँग्रेसकडून रिंगणात असतील.

मल्लिकार्जुन खरगे यांच्या मुलाला उमेदवारी

काँग्रेसने पुन्हा एकदा नेत्यांच्या मुलांना उमेदवारी दिली आहे. जमखंडीमधून आनंद न्यामागौडा, बबलेश्वरमधून एम.बी. पाटील, चितापुरामधून मल्लिकार्जुन खरगे यांचा मुलगा प्रियांक खरगे, चिंचोलीमधून सुभाष राठौर, गुलबर्गा उत्तरमधून कनिज फातिमा, कोप्पलमधून के राघवेंद्र, हुबळी धारवाड पूर्वमधून प्रसाद आणि सागरमधून गोपालकृष्ण हे काँग्रेसचे उमेदवार असतील.

काँग्रेसने यांनाही दिली संधी

काँग्रेसने शृंगेरीमधून टीडी राजगौडा, मधुगिरीमधून केएन रंजना, बागपल्लीतून सुब्बा रेड्डी, चिंतामणीमधून एमसी सुधाकर, कोलार गोल्ड फिल्ड्समधून रूपकला एम, श्रीनिवासपूरमधून रमेश कुमार, मालूरमधून नांजे गौडा, सर्वगंगानगरमधून केजे जॉर्ज, रिजवान अरशद आणि शांती अर्शद यांना उमेदवारी दिली आहे. शिवाजीनगरमधून एनए हरीस यांना नगरमधून उमेदवारी देण्यात आली आहे.