कर्नाटकात अंधश्रद्धाविरोधी विधेयकाला कॅबिनेटकडून हिरवा कंदील

अमानवीय प्रथा आणि काळी जादू, करणी अशा प्रथांना आळा घालण्याच्या उद्देशानं कॅबिनेटनं संमत केलेल्या या विधेयकावर गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. 

Updated: Sep 28, 2017, 07:04 PM IST
कर्नाटकात अंधश्रद्धाविरोधी विधेयकाला कॅबिनेटकडून हिरवा कंदील title=

बंगळुरू : अमानवीय प्रथा आणि काळी जादू, करणी अशा प्रथांना आळा घालण्याच्या उद्देशानं कॅबिनेटनं संमत केलेल्या या विधेयकावर गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. 

हे विधेयक येत्या अधिवेशनात मंजुरीसाठी मांडण्यात येईल. या विधेयकात काही गंभीर प्रकरणांत फाशीच्या शिक्षेचाही समावेश आहे. या विेधेयकामुळे अनेक स्थानिक अनिष्ठ रुढी-परंपरांवर गदा येण्याची शक्यता आहे.

सिद्दुभुक्टी, माता, ओखली सारख्या अनेक प्रथा अपराधिक मानल्या गेल्यात. यामुळे व्यक्तीचा जीव धोक्यात असल्याचं सांगण्यात आलंय. अशा प्रकारांत एखाद्या व्यक्तीचा बळी गेला तर दोषींना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली जाऊ शकते. 

विधेयकात अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांविरोधात कारवाईचीही तरतूद करण्यात आलीय. तसंच नरबळी आणि पशुबळीवरही या विधेयकात बंदी घालण्यात आलीय.