'रश्मी ठाकरेंना जोडे मारणार का?' किरिट सोमय्यांचा पुराव्यासह राऊतांवर हल्लाबोल

Kirit somaiyya vs sanjay raut/ BJP vs Shivsena : शिवसेना नेते संजय राऊत यांच्या आरोपांनी भाजपनेते किरिट सोमय्या यांनी आज उत्तरे दिली

Updated: Feb 16, 2022, 11:01 AM IST
'रश्मी ठाकरेंना जोडे मारणार का?' किरिट सोमय्यांचा पुराव्यासह राऊतांवर हल्लाबोल title=

नवी दिल्ली : रायगड जिल्ह्यातील कोरले ग्रामपंचायतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी उद्धव ठाकरे (Rashmi thackeray) यांनी 19 बंगल्यांचे कर भरले आहेत. तर संजय राऊत कसे काय म्हणू शकतात की, त्याठिकाणी बंगलेच अस्तित्वात नाही?. शिवसेना नेते संजय राऊत यांच्या आरोपांनी भाजपनेते किरिट सोमय्या यांनी आज उत्तरे दिली.

अन्वय नाईक यांनी 2008 मध्ये बंगले बांधले होते. त्यांचा त्यांनी ग्रामपंचायतील कर भरला होता. त्यानंतर या बंगल्यांचा कर आतापर्यंत रश्मी उद्धव ठाकरे आणि मनिषा रविंद्र वायकर ग्रामपंचायतीकडे जमा करीत आहे. संजय राऊत म्हणतात की, त्या ठिकाणी बंगलेच नाहीत. तर रश्मी ठाकरे कशाचा कर भरत आहे? असा सवाल सोमय्या यांनी उपस्थित केला.

किरीट सोमय्या यांनी ED अधिकाऱ्याला 15 कोटी रुपये दिले - राऊत

रश्मी ठाकरे यांनी घेतलेली घरे वनखात्याच्या जमिनीवर बांधली आहेत असा देखील आरोप सोमय्यांनी केला. संजय राऊत गैरव्यवहाराच्या आऱोपांमुळे सध्या अडचणीत आहेत. परंतू त्यांना उद्धव ठाकरे मदत करीत नाहीत, म्हणून त्यांना मुख्यमंत्र्यांवर खुन्नस काढायची असेल तर सोमय्या परिवाराचा का वापर करीत आहेत असाही सवाल सोमय्या यांनी केला.

बंगल्यांचे प्रापर्टी टॅक्स तुम्ही भरत होतात, परंतू तेथे आता बंगले नाहीत. तर बंगले चोरीला गेले का? आम्हीच बाहेर काढलेला घोटाळा संजय राऊत परत महाराष्ट्रासमोर ठेवताय. म्हणजे राऊत यांना उद्धव ठाकरे यांना मदत करायची आहे की, त्यांना उघडं पाडायचंय? असा घणाघातही सोमय्या यांनी केला.

पाटनकर हे रश्मी ठाकरे यांचे बंधू आहेत. कर्जतला हिंदू देवस्थानाची जमीन सलिम नावाच्या एका व्यक्तीच्या नावावर ट्रान्सफर झाली नंतर, ती पाटनकर यांच्या नावावर जमा झाली. यावरही सोमय्या यांनी आक्षेप घेतला आहे. 

राकेश वाधवानशी माझ्या व्यवसायाचा काहीही संबध नाही. मुख्यमंत्री त्यांचेच आहेत. त्यांनी खुशाल चौकशी करावी. आम्ही तयार आहोत. परंतू कोविड सेंटर घोटाळ्याच्या प्रश्नांची उत्तरं द्यावी. असे आव्हानही त्यांनी सरकारला दिले आहे.