येथे रात्री करण्यात येते पतंगबाजी, कारण जाणून व्हाल थक्क

रात्री पतंग उडवण्यामागे गावकऱ्यांचा एक अनोखा उद्देश आहे. 

Updated: Jan 15, 2020, 09:07 AM IST
येथे रात्री करण्यात येते पतंगबाजी, कारण जाणून व्हाल थक्क title=

गुजरात : 'तिळगूळ घ्या..गोडगोड बोला' अर्थात आज सर्व वाईट विचार बाजूला सारून पुन्हा नव्या विचारांनी जीवनाची नात्याची सुरवात केली जाते. तिळाचे लाडू एकमेकांना देवून शुभेच्छा देण्यात येतात. तर मकर संक्रांतीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आज पतंगबाजी केली जाते. आज प्रत्येकाच्या पतंगी आकाशात उंच भरारी घेतील. आपण नेहमी दिवसा पतंग उडवतो पण गुजरातच्या एका गावामध्ये रात्री पतंगबाजीचा आनंत घेण्यात येतो. 

गुजरातच्या बाकरोल गावात दिवसा पंतग न उडवता रात्री पतंगबाजीचा आनंद गावकरी घेतात. घराच्या गच्चीवर प्रकाशाची सोय करून येथील गावकरी पतंग उडवतात. रात्री पतंग उडवण्यामागे गावकऱ्यांचा एक अनोखा उद्देश आहे. पक्ष्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होवू नये म्हणून येथील नागरिक रात्री पतंग उडवतात. 

रात्री पक्षी आप-आपल्या घरट्यांमध्ये आराम करत असतात. तर दिवसा सर्व पक्षी आकाशात उंच भरारी घेत असतात. पतंगीच्या मांज्यामुळे पक्षी मोठ्या प्रमाणात जखमी होतात. तर काही पक्षी मृत्यूमुखी देखील पडतात. त्यामुळे बाकरोल गावातील नागरिक रात्री पतंगबाजी करतात. 

या गावातील बहुतांश नागरिक अमेरिका, कॅनडा येथे वास्तव्यास आहेत. पण फक्त मकर संक्रांतीसाठी ते आपल्या मायदेशी परतात आणि पतंगबाजीमध्ये भाग घेतात. या गावातील पतंगबाजीचा आनंद घेण्यासाठी इतर भागातील लोकांची देखील एकच गर्दी जमते.

शिवाय परदेशातून देखील ही अनोखी पतंगबाजीचे क्षण आपल्या डोळ्यांमध्ये साठवून ठेवण्यासाठी परदेशी पाहुणे येतात. आपल्या भारत देशाला संस्कृतीचा वारसा लाभला आहे त्याला जोड म्हणून याठिकाणी पक्ष्यांची उत्तम काळजी घेण्यात येत असल्यामुळे परदेशी नागरिक येथील लोकांचे कौतुक करतात. 

</