मुंबईः वधूने लाल रंगाचा पोशाख घालण्यामागे काही खास कारणं आहेत. यामागील एक कारण म्हणजे लाल रंग शुभ आहे
वधूने लाल पोशाख घालण्याचं हे काही एकमेव कारण नाही. यामागे एक खास वैज्ञानिक कारणही दडलेली आहे. चला तर मग जाणून घेऊया, लाल नवरीच्या लग्नामागे आणखी कोणती कारणे दडलेली आहेत.
लग्नासारख्या शुभ कार्यात लाल, पिवळा किंवा गुलाबी रंग शुभ मानला जातो आणि हे रंग वापरले जातात. याशिवाय लाल रंगामागील एक कारण म्हणजे हा रंग सौभाग्याचे प्रतीक मानला जातो.
लाल रंग हा ऊर्जेचा स्त्रोत आहे. यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळते. यामुळेच वधूच्या पोशाखाचा रंग लाल असतो.
जिथे एकीकडे लग्नसमारंभात लाल रंगाला खूप महत्त्व दिलं जातं. त्याचबरोबर काही रंगांवरही बंदी घालण्यात आली आहे. हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न आणि इतर शुभ कार्यात काळा, निळा आणि तपकिरी रंग निषिद्ध आहेत. हे रंग अशुभ मानले जातात.
असं म्हणतात की, या रंगांमुळे नकारात्मकता येते आणि शुभ कार्यात नकारात्मकतेला स्थान नसते.