Kolkata Doctor Murder Case: कोलकाता येथे प्रशिक्षित महिला डॉक्टरवर बलात्कार करुन हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेने देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात पोलिस कमिश्नर विनित गोयल हेदेखील चर्चेत आले आहे. या केसमध्ये पोलिसांच्या तपासाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. आता या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. विनित गोयल यांनी दावा केला आहे की, पोलिसांनी या केसमध्ये जे योग्य होतं तेच केलं आहे. विनित गोयल यांच्यावर प्रश्न उपस्थित होत असतानाच पश्चिम बंगालच्या कामदुनी या गावात 2013 साली झालेल्या बलात्कार प्रकरणाची सध्या चर्चा होत आहे. 2013 मध्ये घडलेले कामदुनी हे प्रकरण काय आहे? जाणून घेऊया.
कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये ट्रेनी डॉक्टरसोबत घडलेल्या घटनेची तुलना कामदुनी रेप केससोबत होत आहे. कोर्टात दोन्ही प्रकरणांची तुलना करत याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी विनीत गोयल यांच्या भूमिकेवर पश्न उपस्थित केले आहे. आधीच्या प्रकरणाचाही हवाला दिला आहे. भाजपा आयटीसेलच्या प्रमुख अमित मालवीया यांनी ट्विट करत आरोप केला आहे. ममता बॅनर्जी यांच्या आदेशानुसार कोलकाता पोलिसने आरजी कर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालय बलात्कार व हत्या प्रकरणी पुरावे नष्ट केले आहेत. कोलकाता पोलिसांकडून सुरुवातीच्या कारवाईदेखील खूप विश्वास ठेवण्यासारखी नाहीये, असा आरोप त्यांनी केला आहे.
मालवीया यांनी कोलकाता उच्च न्यायालयातील सुनावणीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये याचिकाकर्त्यांचा वकिल या प्रकरणी सीबीआय तपासाची मागणी करत आहेत. तसंच, या प्रकरणी विनीत गोयल यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. काही वर्षांपूर्वी घडलेल्या एका प्रकरणात त्यांच्या भूमिकेत संदिग्धता असल्याचा हवाला त्यांनी दिला आहे.
Those asking about the Kamduni rape and murder case…
In Kamduni, 20-year-old Shipra Ghosh was gangraped by eight men. After raping her, they tore apart her legs up to the navel, slit her throat and dumped her body in a field.
Ansar Ali, Saiful Ali, Aminoor Ali, Bhutto Molla,… https://t.co/3YecDbxoAk— Amit Malviya (@amitmalviya) August 15, 2024
मालविया यांनी पुढं म्हटलं आहे की, कोलकाता पोलिस कमिश्नर विनीत गोयल यांना भेटा. सीआयडीचे महानिरीक्षक म्हणून ते बहुचर्चित बलात्कार आणि हत्या प्रकरणात तपास अधिकारी होती. त्यात ते पूर्णपणे अपयशी ठरले होते. कामदुनी प्रकरणात पीडीतेच्या शरीरावर जखमांसारखीच कार्यप्रणाली आरजीकर प्रकरणातही वापरण्यात आली आहे.
अमित मालवीया यांनी ट्विटमध्ये ज्या कामधुनी प्रकरणाचा उल्लेख केला आहे. ते 2013 मध्ये घडले होते. बारासात जिल्ह्याच्या एका गावात 20 वर्षीय युवतीवर सामूहिक बलात्कार आणि हत्या करण्यात आली होती. त्यावेळी विनीत गोयल राज्य सीआयडीचे पोलिस महानिरीक्षक होते. 7 जून 2013 साली पश्चिम बंगालच्या कामदूनी गावात एका 20 वर्षांच्या तरुणीचे अपहरण करुन तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. त्यानंतर तिची हत्या करण्यात आली. आठ लोकांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. अत्याचारानंतर नराधमांनी तिच्या पायावर गंभीर वार केले होते. त्यानंतर तिच्या गळ्यावर वार करुन तिची हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह शेतातच फेकून देण्यात आला होता. या घटनेने परिसरात तणाव पसरला होता.