LIC मध्ये सरकारी नोकरीची संधी; 'या' पदांसाठी भरती सुरु

LIC मध्ये ऑफिसर, इंजीनियर पदांसाठी भरती सुरु

Updated: Mar 14, 2020, 11:31 AM IST
LIC मध्ये सरकारी नोकरीची संधी; 'या' पदांसाठी भरती सुरु
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : LIC Recruitment 2020 sarkari naukri एलआयसी अर्थात 'भारतीय जीवन विमा निगम'मध्ये सरकारी नोकरीसाठी संधी उपलब्ध आहे. भारतीय जीवन विमा निगमने एडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर आणि असिस्टेंट इंजिनिअर या पदांसाठी भरती सुरु केली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया २५ फेब्रुवारीपासून सुरु झाली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ मार्च २०२० आहे. 

पदांची संख्या -

असिस्टेंट इंजिनिअर  - ५० 
असिस्टेंट एडमिनिस्ट्रेशन ऑफिसर - १६८

अर्ज करण्याची तारीख - २५ फेब्रुवारी २०२०
अर्ज करण्याची शेवटची तारीख - १५ मार्च २०२०
फी जमा करण्याची शेवटची तारीख - १५ मार्च २०२०
एडमिट कार्ड मिळण्याची तारीख - २७ मार्च २०२०

वयोमर्यादा -

या पदांसाठी कमीतकमी वयोमर्यादा २१ वर्ष आणि अधिकाधिक वयमर्यादा ३० वर्ष इतकी आहे. वयाची गणना १ फेब्रुवारी २०२०च्या आधारे करण्यात येणार आहे. एससी आणि एनटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेत ५ वर्षांची सूट देण्यात आली आहे. तर ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३ वर्षांची सूट आहे.

या भरतीबाबत अधिक माहितीसाठी https://www.licindia.in/getattachment/Bottom-Links/Recruitment-of-Assist...(1)/Recruitment-Notification-English-(2).pdf.aspx या अधिकृत वेबसाईटवर माहिती घेऊ शकता. त्याशिवाय https://www.sarkarinaukridaily.in/lic-aao-recruitment-2020/ या लिंकवरुनही अधिक माहिती घेता येऊ शकते. 

शिक्षण -

भारतीय जीवन विमा निगममध्ये असिस्टेंट इंजिनिअर (सिविल, इलेक्ट्रिकल, आर्किटेक्ट, स्ट्रक्चरल, इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल – एमईपी इंजीनियर्स)  पदासाठी भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून त्या पदासाठी संबंधित ट्रेडमध्ये बीई/बीटेक डिग्री किंवा त्यासंबंधित योग्यता असणं आवश्यक आहे. 

असिस्टेंट एडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर (AAO) पदांसाठी संबंधित ट्रेडमध्ये बॅचलर्स किंवा मास्टर्स डिग्री किंवा सीए उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. 

या भरतीसाठी बेसिक पे ३२,७९५ रुपये प्रति महिना असेल.