गुरूग्राम : मेदांताच्या आंतरिक (इंटरनल) फार्मसीचे लायसन्स गुरूवारी (5 एप्रिल) रद्द करण्यात आलं आहे. मागील वर्षी डेंग्यूची लागण झाल्याने सात वर्षीय मुलाचं निधन झालं. या मुलाच्या औषधोपचाराचे बील पाहून त्याचे वडील अवाक झाले आणि त्यांनी तक्रार नोंदवली आहे.
सात वर्षीय शौर्य प्रतापचा मृत्यू डेंग्यूमुळे झाला. गुरूग्रामच्या मेदांता हॉस्पिटलने याकरिता 15 लाख 88 हजाराचे बील दिले. हे बील भरण्यासाठी शौर्यच्या वडिलांना त्यांचं घर गहाण ठेवावं लागलं आहे. मात्र यानंतरही त्यांच्या मुलाचे प्राण वाचू शकलेले नाहीत.
मेडिकल बोर्डाने 5 मार्च रोजी रिपोर्ट जमा केल्यानंतर सुमारे 1 महिन्याने आला. शौर्यच्या वडिलांनी प्रेस कॉन्फर्समध्ये औषधोपचारामध्ये खर्च केलेले सारे पैसे परत मिळाले आहेत अशी माहिती दिली आहे. तसेच याप्रकरणावर हॉस्पिटल विरोधात कोणतीही कायदेशीर कारवाई करणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
तपासणीदरम्यान मेदांता हॉस्पिटलने औषधांचा रेकोर्ड नीट न ठेवल्याचे, प्रमाणापेक्षा अधिक बील आकारल्याचे म्हटले आहे. वरिष्ट ड्रग अधिकारी सुनील चौधरीच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणी फार्मसीचे लायसंस रद्द करण्यात आलं आहे. हॉस्पिटलकडून या प्रकरणी नोटिशीबद्दल कोणतेच ठोस उत्तर देऊ शकलेले नाही, म्हणूनच ही कारवाई करण्यात आली आहे.