शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ! सिंहाला हरणाने असा दिला चकवा की....

बुद्धी वापरून हरणानं असा वाचवला स्वत:चा जीव... पाहा व्हिडीओ

Updated: Nov 28, 2021, 02:06 PM IST
शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ! सिंहाला हरणाने असा दिला चकवा की....

मुंबई: शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असं नेहमी म्हटलं जातं. याची प्रचिती हा व्हिडीओ पाहून येते. पाणी पिण्यासाठी हरिण आलं होतं. त्याच वेळी सिंह तिथे दबा धरून शिकारीसाठी बसला होता. एक क्षण हरणाला आपल्यावर कोणीतरी नजर ठेवत आहे असं वाटलं. पण नंतर हरिण या सिंहाला चकवा देत आपला जीव वाचवतं. सोशल मीडियावर याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

हरणाच्या कुशाग्र बुद्धीसमोर जंगलाच्या राजाची प्रत्येक चाल अपयशी ठरली. त्याने बुद्धीचा वापर करून हरणाने आपला जीव वाचवला. सोशल मीडियावर या व्हिडीओला खूप चांगला प्रतिसाद दिला आहे. 

तलावाच्या काठी हरिण पाणी पिण्यासाठी आलं. तेव्हा सिंहाने हरणावर हल्ला केला. मात्र या व्हिडीओमध्ये सिंहाचा हल्ला चुकला. सिंह हल्ल्यासाठी ज्या दिशेनं गेला तिथून चकवा देत हरिण विरुद्ध दिशेनं पळून गेलं.

रंबल व्हायरल नावाच्या यूट्यूब चॅनलवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवरून शक्तीपेक्षा युक्ती कशी श्रेष्ठ आहे ते दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.